Devendra Fadnavis : लोकसभेची धामधुम, जागावाटपाची गडबड; पण देवेंद्र फडणवीसांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यासाठी वेळ काढलाच
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बैठकांच्या व्यस्त सत्रानंतर देवेंद्र फडणवीस आज या सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगला हजेरी लावणार आहेत.
Devendra Fadnavis in Swatantra Veer Savarkar : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) अभिनीत आणि दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकूळ घालणाऱ्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता बैठकांच्या व्यस्त सत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट पाहणार आहेत. संध्याकाळी सात वाजता अंधेरी येथील फन रिपब्लिक सिनेमागृहात विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' मराठी चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या मराठी चित्रपटाचं आज (30 मार्च 2024) विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे. सिनेमातील मुख्य कलाकार रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांच्या उपस्थितीत हे विशेष स्क्रीनिंग पार पडणार आहे. या विशेष स्क्रीनिंगला सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित असणार आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या मुद्दांवर मनसे आक्रमक
'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला प्राईम टाईम देण्याची मागणी मनसेने (MNS) केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील Movie Max चित्रपटगृहाच्या व्यसस्थापकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. चित्रपटगृह प्रशासनाकडून प्राईम टाईम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आश्वासनानंतरही प्राईम टाईम न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकारी मनोज घोडके यांनी दिला आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Swatantra Veer Savarkar Box Office Collection)
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमाने 1.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.7 कोटी, चौथ्या दिवशी 2.15 कोटी, पाचव्या दिवशी 1.05 कोटी, सहाव्या दिवशी 1 कोटी आणि सातव्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या सात दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11.35 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंह, अमित सियाल, मार्क बेनिंगटन आणि एमिली आर एकलँड हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. झी स्टुडिओ, आनंद पंडित, संदीप सिंह, रणदीप आणि योगेश राहन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर रूपा पंडित, सैम खान, अनवर अली आणि पांचाली चक्रवर्ती यांनी सहनिर्मिती केली आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या