एक्स्प्लोर

Deepika Padukone With Mahesh Babu: Singham Again नंतर दीपिका पदुकोण करणार महेश बाबूचा 1000 कोटींचा सिनेमा? राजामौली काहीतरी भन्नाट साकारण्याच्या तयारीत

Deepika Padukone With Mahesh Babu: दिग्दर्शक राजामौली आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांचा आगामी चित्रपट SSMB29 बाबत दररोज काहीना काही अपडेट्स येत असतात.

May Deepika Padukone to Romance Mahesh Babu in Mega Movie: आता साऊथ सिनेमा इंडस्ट्रीमधले दोन दिग्गज एकत्र येऊन एक बिग बजेट सिनेमा करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगानं त्यांची तयारी देखील झाल्याची माहिती मिळत आहे. ही जोडी म्हणजे, सुपरडुपर हीट सिनेमे तयार करणारे दिग्दर्शक राजामौली (S. S. Rajamouli) आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu). 

दिग्दर्शक राजामौली आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांचा आगामी चित्रपट SSMB29 बाबत दररोज काहीना काही अपडेट्स येत असतात. काही दिवसांपूर्वीच महेश बाबू या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या. तसेच, या चित्रपटात AI चा वापर केला जाणार असल्यानं राजामौली AI टेक्नॉलॉजीचा प्रशिक्षण घेत असल्याचंही समोर आलं होतं. याशिवाय राजामौली सध्या केनियामध्ये आपल्या चित्रपटासाठी हटके लोकेशनच्या शोधात आहेत, अशी माहिती मिळत आहे. एकंदरीतच सांगायचं तर महेश बाबू आणि राजामौली दोघांनीही या चित्रपटासाठी कंबर कसली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी चित्रपट SSMB29 एक जंगल अॅडव्हेंचर चित्रपट असणार आहे. त्यासाठी जंगल आणि प्राणी दोन्हींची गरज आहे. तसेच, शुटिंग लवकरच सुरू होणार असल्यामुळे सध्या राजामौली महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी एका उत्तम अभिनेत्रीच्या शोधात आहेत. राजामौलींनी एका इंडोनेशियन अभिनेत्रीला साईन केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचीही (Deepika Padukone) या चित्रपटात वर्णी लागणार असल्याचं समोर आलं होतं. पण त्यानंतर या सर्व अफवा असल्याचं सांगण्यात आलं. पण, त्यानंतर पुन्हा दीपिका पादुकोण राजामौली आणि महेश बाबू यांच्या बिग बजेट चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दीपिका झळकणार SSMB29 मध्ये... 

सिनेजोशच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोन सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यापैकी एक SSMB29 आहे. दरम्यान, राजामौली यांच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं सशक्त महिला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात. SSMB29 मध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. यासाठी दीपिका पदुकोन ही राजामौली यांची टॉप चॉईस आहे, अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. दीपिका पदुकोननं या चित्रपटाबाबत आपला निर्णय सांगण्यासाठी काही वेळ मागितल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, असं सांगितलं जात आहे की, दीपिकानं नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या तिला आपल्या बाळासाठी वेळ द्यायचा असून तिला लगेच शूटिंग सुरू करायचं नाही.

View this post on Instagram
 
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

दीपिकाच्या उत्तराकडे सर्व इंडस्ट्रीचं लक्ष... 

राजामौली यांना आगामी चित्रपटात दीपिकाला कास्ट करायचं आहे. पण, त्यासाठी दीपिकाला टाईम मॅनेज करावा लागणार आहे. राजामौली जास्त वेळ थांबू शकत नाहीत, त्यामुळे दीपिकानं खूप उशीराच्या तारखा दिल्या, तर मात्र, सारंच खूप अवघड होणार आहे. कदाचित दीपिका SSMB29 चा भाग बनू शकणार नाही, असंही बोललं जात आहे. 

दरम्यान, SSMB29 व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण आणखी एक प्रोजेक्ट करत आहे. हॉरर कॉमेडी स्पेस प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. 'स्त्री 2' चे प्रोडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सचा हा प्रोजेक्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कार्तिक आर्यन नाही, तर 4 वर्षांपूर्वी जग सोडून गेलेल्या 'या' अभिनेत्याला होती 'भूल भुलैया 2'साठी निर्मात्यांची पहिली पसंती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 07 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्सShweta Mahale : भाजपच्या श्वेता महाले यांच्यासोबत दिवाळी आणि राजकीय फराळManoj Jarange  : सत्तापरिवर्तनसाठी आम्ही एकत्र, मुस्लिम समाजासोबत बैठकीनंतर जरांगेंनी बांधली मूठABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
Embed widget