![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Deepika Padukone-Ranveer Singh :'या' दिवशी होणार दीपिका-रणवीरच्या चिमुकल्याचं आगमन? बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती समोर
Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका आणि रणवीरच्या बाळाच्या जन्मतारखेविषयी सध्या महत्त्वाची माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.
![Deepika Padukone-Ranveer Singh :'या' दिवशी होणार दीपिका-रणवीरच्या चिमुकल्याचं आगमन? बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती समोर Deepika Padukone, Ranveer Singh To Welcome Their Baby On This Date Bollywood Entertainment news in marathi Deepika Padukone-Ranveer Singh :'या' दिवशी होणार दीपिका-रणवीरच्या चिमुकल्याचं आगमन? बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/31/8ef9b7303603ea35d4cc7671782fdcd11725118321261720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Deepika Padukone-Ranveer Singh : मागील अनेक दिवसांपासून बी टाऊनमधल्या एका कपलविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) आता लवकरच आई बाबा होणार आहेत. काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांचं बाळ सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता काहीच दिवसांत त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
या सगळ्यातच आता या दोघांच्याही बाळाच्या बर्थ डेटची चर्चा सुरु झाली आहे. म्हणजेच दीपिका आणि रणवीरचं बाळ कोणत्या दिवशी येणार ती तारीख सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय. रिपोर्ट्सनुसार, दीपिका मुंबईतील रुग्णालयातच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. असं जरी असलं तरी कोणत्या दिवशी दीपिका रणवीरचं बाळ जन्माला येणार याची उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये आहे.
'या' दिवशी येणार दीपिका-रणवीरचं बाळ
दरम्यान दीपिका आणि रणवीरच्या बाळाच्या बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे. दीपिका रणवीरच्या एका जवळच्या व्यक्तीने याविषयी न्यूज 18ला माहिती दिली आहे. त्या व्यक्तीने म्हटलं की, दीपिका आणि रणवीर त्यांच्या या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे दीपिका तिच्या मातृत्वाचा हा काळही एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच दीपिका 28 सप्टेंबरला त्यांच्या बाळाला जन्म देऊ शकते.
दीपिका रणवीर बाळासोबत जाणार नव्या घरात?
या दोघांच्या 100 कोटींहून अधिक किंमतीच्या नव्या घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या या इमारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही इमारत शाहरुख खानच्या घर 'मन्नत'च्या अगदी जवळ आहे. हा भाग मुंबईतील सर्वात पॉश आणि महागडा म्हणून ओळखला जातो. रणवीर आणि दीपिकाने दोन वर्षांपूर्वी या इमारतीत अपार्टमेंट बुक केले होते. तेव्हापासून घराचे काम सुरू होते. त्यामुळे बाळासोबत हे दोघेही नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रणवीर-दीपिका यांनी या घरासाठी 119 कोटी मोजले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठी चर्चा झाली. घर खरेदीमधील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक व्यवहार समजला जातो. रणवीर-दीपिका यांनी 16,17,18 आणि 19 मजले खरेदी केले आहे. अपार्टमेंटमध्ये एकूण 11, 266 चौफूट चटईक्षेत्र आहे. त्यासोबतच 1300 चौफूटचा एक्सक्लूसिव्ह टेरेस देखील आहे. इमारतीमध्ये 19 पार्किंग स्पेस आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)