Deepika Padukone Hospitalised: गणरायाच्या आशीर्वादाने घरी येणार चिमुकला पाहुणा, दीपिका पादुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल
Deepika Padukone Hospitalised: दीपिका पादुकोण ही मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली असून लवकरच ती बाळाला जन्म देऊ शकते.
![Deepika Padukone Hospitalised: गणरायाच्या आशीर्वादाने घरी येणार चिमुकला पाहुणा, दीपिका पादुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल Deepika Padukone Ranveer Singh Arrive At Mumbai Hospital Ahead of Welcoming Their Baby Bollywood entertainment news in marathi Deepika Padukone Hospitalised: गणरायाच्या आशीर्वादाने घरी येणार चिमुकला पाहुणा, दीपिका पादुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/8ad7678eb2fd86e008045106d6cc06531725713724637720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Deepika Padukone Hospitalised: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली तेव्हाच ती सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता तिला रिलायन्स रुग्णालयात दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.
दीपिका पदुकोणला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ती कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. रिलायन्स रुग्णालयात जाताना दीपिकाची गाडी दिसली. त्यावेळी तिच्यासोबत दीपिका पदुकोणसोबत तिच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही दिसले.
दीपिका रणवीरने घेतलं होतं सिद्धीविनायकाचं दर्शन
दरम्यान दीपिका आणि रणवीर यांनी नुकतच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे आता दीपिका रुग्णलयात दाखल झाली असून ती लवकरच बाळाला जन्म देईल. रणवीर आणि दीपिकाने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं त्यावेळीही गर्दीत रणवीर तिला सांभाळताना दिसला. तसेच दीपिकाला मुलगा होणार की मुलगी याचीही उत्सुकता लवकरच संपणार आहे.
View this post on Instagram
याच हॉस्पिटलमध्ये रणबीर-आलियाच्या मुलीचा झाला होता जन्म
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर हिचाही जन्म मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये झाला होता. रणबीर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले होते.लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांनी तिने राहाला जन्म दिला. राहाचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये झाला होता ज्यामध्ये दीपिकाची प्रसूती होणार माहिती आहे.
रणवीर-दीपिका लग्नाच्या 6 वर्षानंतर आई-वडील होणार
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या 6 वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. या स्टार जोडप्याने 2018 साली मोठ्या थाटामाटात लग्न केले. दीपिका तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका पदुकोणनेही नुकतेच प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बेबी बंपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर सिंगही तिच्यासोबत पोज देताना दिसला.
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर कॅप्टन सूरजचं कौतुक, रितेशनेही दिला खास सल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)