Deepika Padukone Troll: 'रेनकोट घातलाय...'; फिफा वर्ल्ड कप 2022 ला गेलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं (Deepika Padukone) एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. सध्या काही नेटकरी दीपिकाच्या ड्रेसला ट्रोल करत आहेत.
Deepika Padukone Troll: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या चर्चेत आहे. यंदा दीपिकाला फिफा वर्ल्ड कप 2022 (fifa world cup final 2022) ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. सध्या काही नेटकरी दीपिकाच्या ड्रेसला ट्रोल करत आहेत.
दीपिकानं फिफा वर्ल्ड कप 2022 ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला दीपिकानं ब्लॅक पँट, व्हाइट शर्ट आणि ब्राउन कलरचे लेदर कोट असा लूक केला होता. तिच्या या लूकला अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'दीपिका ही रणवीरनं साकारलेल्या अलाउद्दीन खिलजीसारखी दिसत आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं दीपिकाच्या फोटोवर कमेंट केली, 'तिनं रेनकोट का घातला आहे?' 'ती रणवीरला कॉपी करत आहे' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली.
पठाणमुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात
दीपिका सध्या तिच्या पठाण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं 12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं काही नेटकऱ्यांनी या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला.'बेशरम रंग' गाण्यातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan: 'बेशरम रंग नाही तर लोकांचे...'; अभिनेत्रीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष