Deepika Padukone On Time magazine Cover: कौतुकास्पद! टाइम मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली दीपिका
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या एलिट क्लबमध्ये दीपिकाच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे.
Deepika Padukone On Time magazine Cover: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे. दीपिकानं हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या एलिट क्लबमध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. दीपिका पदुकोण टाइमच्या कव्हर पेजवर दिसणार्या काही भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. याबाबत दीपिकानं सांगितलं, 'माझ्या देशात राहात असताना जगभरात प्रभाव पाडण्येच माझे ध्येय नेहमीच असणार आहे.'
दीपिकाने जगामध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली, 'भारतीय सिनेमाने सीमा ओलांडल्या आहेत आणि आज भारतीय लोक सर्वत्र आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते.'
View this post on Instagram
दीपिकानं टाइमच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटच्या BTS चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दीपिकाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
दीपिकानं भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे. तिनं ऑस्कर 2023 मध्ये प्रेझेंटर ही भूमिका पार पाडली. 'ऑस्कर 2023' च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश होता. Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर देखील झाली होती.
दीपिका पदुकोणने शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत मागील चित्रपट पठाणमध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले. 'पठाण'ने जगभरात 1050 कोटींहून अधिक कलेक्शन करून इतिहास रचला आहे. आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि फायटर सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Deepika Padukone's Selfie: दीपिकाची कुटुंबासोबत भूतान ट्रिप; चाहत्यांसोबत काढले फोटो