एक्स्प्लोर
अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नी शिवानीने मौन सोडलं

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीचं वैवाहिक आयुष्य धोक्यात आलं आहे. दीपकने सगळ्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं सांगत पत्नी शिवानी यांनी मौन सोडलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे शिवानी यांनी दीपक तिजोरीविरोधात गप्प बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेर त्यांनी दीपकने सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 'दीपकचं माझ्यासोबतचं वर्तन असभ्य होतं. सभ्यता, नैतिकता, संवेदनशीलता आणि समंजसपणाच्या सर्व हद्द त्याने सोडल्या आहेत.' असा दावा शिवानी यांनी केला आहे. दीपक तिजोरीची भूमिका असलेले जो जिता वही सिकंदर, खिलाडी, दिल, दिल है के मानता नही, बेटा यासारखे चित्रपट 90 च्या दशकात गाजले होते. 2000 नंतर दीपक तिजोरीने मुख्यत्वे दिग्दर्शन क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. 'दीपकसोबत मी 22 हून जास्त वर्ष संसार केला आहे. तो माझ्या मुलीचा पिता आहे. मात्र त्याने सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून वागत आहे. हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे मी काहीही न बोलण्याचं ठरवलं होतं' असं शिवानी म्हणतात. शिवानी यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला नसल्याने आमच्या 22 वर्षांच्या संसाराला वैवाहिक आधार नसल्याचा दावा दीपक तिजोरीने केला होता. लग्न अवैध ठरल्याने दीपक तिजोरीला पत्नीने घराबाहेर काढल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरु आहेत. 'प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्ती म्हणून माझ्याकडे लपवण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काही नाही. कोर्टाने सत्यता पडताळून निर्णय घ्यावा. जे खरं आहे, ते उजेडात येईलच' अशी खात्री शिवानी यांना वाटते.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















