Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर नानीचा दसरा आणि अजयचा भोला ठरतोय हिट; चौथ्या दिवशी चित्रपटांनी केली एवढी कमाई
दसरा या चित्रपटाची अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) भोला (Bholaa) या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. जाणून घेऊयात दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनबाबत...
Box Office Collection : सध्या साऊथ चित्रपट हे बॉक्स ऑफिवर धुमाकूळ घालत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दसरा या चित्रपटाची अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) भोला (Bholaa) या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. पण या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (3 एप्रिल) अजयच्या भोला या चित्रपटानं आणि नानीच्या दसरा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनबाबत...
अजयच्या 'भोला'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
अजय देवगणच्या भोला या चित्रपटाने शनिवारी (1 एप्रिल) 12.10 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर भोला चित्रपटानं चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (2 एप्रिल) 14 कोटींचे कलेक्शन केला आहे. त्यानंतर आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 44.70 कोटी रुपये झाले आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं म्हटलं जात आहे.
दसरा चित्रपटानं केली एवढी कमाई
'दसरा'ने शनिवारी 12.1 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर या चित्रपटानं चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 13 कोटींचे कलेक्शन केलं आहे. नानीच्या दसरा या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 58.05 कोटींवर गेली आहे.
'भोला' चित्रपटाची स्टार कास्ट
अजय देवगणने 'भोला' दिग्दर्शित केला आहे. याआधी त्याने 'यू मी और हम', 'शिवाय' आणि 'रनवे 34' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं. अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता त्याचा भोला हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये समील होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
नानीच्या दसरा चित्रपटाची स्टार कास्ट
नानी हा साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नानी हा दसरा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. श्रीकांत ओडेला यांनी दसरा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात नानीसोबतच साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: