एक्स्प्लोर

चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, 'दंगल'गर्ल झायरा वसिमची पोस्ट

दंगल चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसिमने आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.

मुंबई : दंगल, सिक्रेट सुपरस्टार यासारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिमने आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगितलं. आपण डिप्रेशनमध्ये असल्याचा स्वीकार अखेर चार वर्षांनंतर केल्याचं झायरा सांगते. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून झायराने ही गोष्ट सांगितली आहे. काय आहे झायराची पोस्ट? एका मोठ्या काळापासून मला अँक्झायटी आणि डिप्रेशनने ग्रासले आहे. आता जवळपास चार वर्ष झाली असून ही गोष्ट मान्य करायला मी कचरत होते.. घाबरत होते. याचं एक कारण म्हणजे डिप्रेशन या शब्दाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन. त्याहून महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन येण्यासाठी तू फारच लहान आहेस, किंवा ही तात्पुरती अवस्था असल्याचं मला सांगितलं जायचं. ही तात्पुरती अवस्था असू शकली असती, पण या अवस्थेनेच मला नकोशा परिस्थितीत आणून सोडलं आहे. दिवसाला अँटिडिप्रेशनच्या पाच गोळ्या, अँक्झायटी अटॅक्स, रात्री-अपरात्री हॉस्पिटलच्या फेऱ्या, रितेपणा, अस्वस्थता, हूरहूर, हॅल्युसिनेशन्स, सूज, अतिझोप किंवा आठवडाभर डोळ्याला डोळा न लागणं, खूप खाणं किंवा भूक उडणं, थकवा, अंगदुखी, स्वतःचा तिटकारा येणं, नर्व्हस ब्रेकडाऊन, आत्महत्येचे विचार... हे सगळं त्या अवस्थेचा भाग होते. माझ्यासोबत काहीतरी ठीक नाही, हे मला समजत होतं. हे डिप्रेशन आहे, असंही कधी वाटायचं. वयाच्या बाराव्या वर्षी मला पहिला पॅनिक अटॅक आला होता. चौदाव्या वर्षी दुसरा.. त्यानंतर तर ते मोजणंच बंद केलं. किती औषधं घेतली, याची मोजदादच नाही. कितीवेळा 'तू डिप्रेशनसाठी खूपच लहान आहेस' हे सांगितलं गेलं, याची गणती नाही. डिप्रेशन असं काही नसतंच, असंही मला सांगितलं गेलं. जगभरात 350 मिलियन व्यक्तींना ज्याने ग्रासलं आहे, ते डिप्रेशन मलाही आल्याचं मान्य करायला मी तयारच नव्हते. ही भावना नाही, हा आजार आहे. मला डिप्रेशनचं निदान होऊन साडेचार वर्ष लोटली. अखेर मी माझं हे रुप स्वीकारायला तयार झाले. आता मला सगळ्यापासून ब्रेक हवा आहे. माझं काम, सोशल लाईफ, शाळा आणि विशेष म्हणजे सोशल मिडीया. मला आशा आहे की येत्या रमझानच्या पवित्र महिन्यात सकारात्मक बदल घडेल. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या भावनिक चढउतारांमध्ये माझी साथ देणाऱ्या सर्वांना मिठी. इतका संयम ठेवल्याबद्दल माझ्या कुटुंबीयांचे विशेष आभार. झायराच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. झायराने दंगल, सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये आमिर खानसोबत काम केलं आहे. झायराला दंगलमधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपल्याला डिप्रेशन आल्याचं सांगितलं होतं. आता 17 वर्षांच्या झायरानेही हे मान्य केलं आहे. झायरा लवकर यातून बरी होईल, याच सदिच्छा.

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Embed widget