Damodar Natyagruha : परळच्या दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत; प्रशासन दाद देत नसल्याचं समोर
Damodar Natyagruha : परळच्या दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत असल्याचं समोर आलं आहे.
Damodar Natyagruha : नाटकासह तमाशा, लावणी आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणारी रंगकर्मींची हक्काची जागा म्हणजे परळचं दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha). 101 वर्षांची परंपरा असणारं दामोदर नाट्यगृह गेल्या काही दिवसांपासून पुनर्बांधणीमुळे चर्चेत आहे. अशातच आता परळच्या दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेले दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामासाठी 1 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव आहे. नाट्यगृह छोटंसं बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरण्यात येणार आहे. त्याला सोशल सर्व्हिस लीगने आणि मनोरंजन सहकारी मंडळ करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना पूर्वी पेक्षा लहान आणि त्या जागेवर दुसरी शाळेची वास्तू उभारली जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात आणि नाट्यगृह मोठं आणि अत्याधुनिक उभाराव, जुन्या संस्थांना, कलाकारांना कार्यालयं द्यावी या मागणीसाठी यापूर्वी सोशल सर्व्हिस लीगने आणि कलाकार मंडळी यांनी आंदोलन केलं होतं. मात्र प्रशासन दाद देत नसल्याने आता कलाकार मंडळी पुन्हा उपोषण करण्याचा तयारीत आहेत.
नाट्यकर्मींचं बचाव आंदोलन
मराठी नाट्यकर्मी, गिरणगावातील मराठी नाट्यसरिक आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांनी दामोदर नाट्यगृह 'बचाव आंदोलन' सुरू केलं आहे. गिरणगावातील सांस्कृतिक इतिहास आणि वारसा जमीनदोस्त करू पाहणाऱ्या प्रवृतींचा त्यांनी शांततापूर्व जाहीर निषेध केला आहे.
नाट्यकर्मींच्या मांगण्याबद्दल शासन खूप संवेदनशील आहे. त्यांची भूमिकादेखील खूप आश्वासक आहे. पण जर त्यांच्या मागण्या मान्य होणार नसतील तर त्यांना नाईलाजाने उपोषण करावं लागेल,असं मत दामोदर नाट्यगृह बचाव आंदोलनचे समन्वयक श्रीधर चौगुले यांनी मांडलं आहे.
दामोदर नाट्यगृहाबद्दल जाणून घ्या...
परळच्या दामोदर नाट्यगृहात विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम तसेच नाटकांच्या तालमीदेखील होत असे. लहान-मोठ्या कलाकारांसाठी ते हक्काचं व्यासपीठ होतं. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अनेक रंगकर्मींच्या कारकिर्दीचं ते उमगस्थान आहे.
मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्विस लीगने 1992 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे.
संबंधित बातम्या