Dada Ek Good News Ahe : 'दादा एक गुड न्यूज आहे' नाटकाने पार केला 250 प्रयोगांचा टप्पा; प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
Dada Ek Good News Ahe : 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाने आता 250 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.
Dada Ek Good News Ahe : 'दादा एक गुड न्यूज आहे' (Dada Ek Good News Ahe) या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत. या नाटकात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि उमेश कामत (Umesh Kamat) मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या नाटकाने 250 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.
गंभीर विषय विनोदी पद्धतीने मांडण्याचं काम 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक करत आहे. हे नाटक सध्या नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. नुकताच या नाटकाचा 250 वा प्रयोग डोबिंवलीच्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात पार पडला. मन्या आणि विनीत या भावाबहिणींची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
View this post on Instagram
'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक तरुणांना कनेक्ट करणारं आहे. या नाटकामुळे तरुण मंडळी नाटकाकडे वळण्यास मदत झाली आहे. या नाटकात हृता दुर्गुळे, उमेश कामतसह आरती मोरे, आशुतोष गोखलेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री प्रिया बापटने या नाटकाची निर्मिती केली आहे. तसेच या नाटकाचे लेखन कल्याणी पाठारेने केलं असून अद्वैद दादरकरने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद!
'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा नुकताच 250 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे नाट्यगृहे बंद होती. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रेक्षक नाट्यगृहात जात आहेत. अनेक नाट्यगृहांबाहेर हाऊस फुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या 250 व्या प्रयोगानंतर उमेश कामत आणि नाटकाच्या संपूर्ण टीमने नाट्यरसिकांचे आभार मानले.
संबंधित बातम्या
Natak : 'दादा एक गुड न्यूज आहे', सावित्रीबाई फुले रंगमंदिरात दोन वर्षांनी झळकला 'हाऊस फुल्ल'चा फलक
Ketaki Chitale : केतकी चितळेला तूर्तास दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक करणार नाही