Critics Choice Awards 2023 : राजामौलींचा 'RRR' ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा! पटकावला 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड'
RRR : एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने आता क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे.
![Critics Choice Awards 2023 : राजामौलींचा 'RRR' ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा! पटकावला 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड' Critics Choice Awards 2023 full winners list RRR bags Best Foreign Film and Best Song for Naatu Naatu Critics Choice Awards 2023 : राजामौलींचा 'RRR' ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा! पटकावला 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/225d1e771b541ff29d66c1919a41affc1673849387543254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Critics Choice Awards 2023 : एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards) पटकावल्यानंतर आता या सिनेमाने जगभरातील सिनेमांना मागे टाकत क्रिटिक्स चॉइस अवॉर्डवर (Critics Choice Award) आपलं नाव कोरलं आहे.
'आरआरआर' (RRR) हा परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तसेच 'नाटू-नाटू' (Naatu Naatu) या गाण्यालाही सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
Congratulations to the cast and crew of @RRRMovie - winners of the #criticschoice Award for Best Foreign Language Film.#CriticsChoiceAwards pic.twitter.com/axWpzUHHDx
— Critics Choice Awards (@CriticsChoice) January 16, 2023
क्रिटिक्स चॉइस पुरस्कार सोहळ्याचं हे 28 वं वर्ष आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन प्रेक्षकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,"आरआरआर' (RRR) या सिनेमातील कलाकार आणि या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन.... बेस्ट फॉरेन लॅँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे".
Cheers on a well deserved win @RRRMovie 🥂! pic.twitter.com/f3JGfEitjE
— Critics Choice Awards (@CriticsChoice) January 16, 2023
क्रिटिक्स चॉइस अवॉर्डच्या ट्वीटर हॅंडलवर एसएस राजामौलींचा एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजामौली खूपच आनंदी दिसत आहेत. 'आरआरआर' या सिनमात अजय देवगण, आलिया भट्ट, श्रिया सरनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
आरआरआर' या सिनेमाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे.
View this post on Instagram
'आरआरआर' या सिनेमात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा मार्चमध्ये तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळ आणि हिंदीत सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. एसएस राजामौलींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या
SS Rajamouli : 'गोल्डन ग्लोब पुरस्कारा'नंतर एसएस राजामौली Steven Spielberg च्या भेटीला; फोटो शेअर करत म्हणाले,"देवाची भेट झाली"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)