(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तापसी पन्नूने कवितेतून मांडली मजूरांची व्यथा; आपल्या आवाजात शेअर केला व्हिडीओ
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी उद्योगधंदे बंद झाल्यामुळे देशातील विविध राज्यांत अडकलेल्या मजूरांनी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी मिळेल त्या वाहानाने, तर काहींनी पायी प्रवास सुरु केला होता.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. एवढचं नव्हे तर ती, बिनधास्तपणे प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होत असते. आताही तापसी सोशल मीडियावरून अशाच एका मुद्दावर व्यक्त झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे अनेक उद्यागधंदे बंद झाले. त्यामुळे अनेक मजूरांच्या हातातली कामं गेली. खाण्यासाठी अन्न नाही, की खिशात पैसे नाही. या मजुरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. त्यामुळे देशभरातील लाखो प्रवासी मजुरांच्या वेदना एका कवितेमार्फत तापसीने चाहत्यांसोबत आपल्या आवाजात शेअर केल्या आहेत. कोरोना काळात झालेलं मजुरांचं स्थलांतर फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं सांगितलं जात आहे.
तापसी पन्नूने इंस्टाग्रामवर आपली कविता 'प्रवासी' शेअर केली आहे. जवळपास 1 मिनिटं 42 सेकंदांपर्यंत वाचलेल्या या कवितेत तापसीने मजुरांचं दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जे दुःख प्रवासी मजुरांच्या नशीबी गेल्या काही महिन्यांपासून आलं आहे. तापसीच्या कवितेची पहिलीच ओळ आहे, 'हम तो बस प्रवासी हैं, क्या इस देश के वासी हैं?'
तापसी पन्नूने इंस्टाग्रामवर कविता शेअर करत लिहिलं आहे की, 'फोटोंची एक अशी मालिका जी आपल्या डोक्यातून कधीच जाणार नाही. त्या रांगा आपल्या डोक्यात बऱ्याच दिवसांपर्यंत ओरडत राहतील. ही महामारी भारतासाठी एखाद्या व्हायरल संसर्गापेक्षा अधिक वाईट आहे. माझ्या हृदयापासून, तुमच्या हृदयापर्यंत, त्या हजारो हृदयांसाठी ज्यांना आपण सर्वांनी ठेच पोहोचवली आहे.'
तापसीने शेअर केलेल्या कवितेच्या व्हिडीओमध्ये लॉकडाऊन दरम्यान, व्हायरल झालेले मुजरांचे फोटो आहेत. त्या फोटोंमधून व्यक्त होणारे भाव पाहून संपूर्ण देश भावूक झाला आहे. या फोटोंना अॅनिमेशनचं स्वरूप देण्यात आलं आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या अॅनिमेटेड फोटोंसोबत तापसी बँकग्राउंडमध्ये आपल्या आवाजात कविता वाचत आहे. यामध्ये त्या प्रवशांच्या समस्या आणि तक्रारी यांना उत्तम प्रकारे सादर करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुळशी पॅटर्नचा हिंदीत होणार 'गन्स ऑफ नॉर्थ', ओम भूतकरच्या जागी 'हा' अभिनेता
अमिताभ बच्चन यांना सेटवर नो एन्ट्री! नियमावलीमुळे ज्येष्ठ कलाकारांची गोची
'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे
दीपिकाकडून एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर; पती रणवीरने केली 'ही' कमेंट