एक्स्प्लोर

मुळशी पॅटर्नचा हिंदीत होणार 'गन्स ऑफ नॉर्थ', ओम भूतकरच्या जागी 'हा' अभिनेता

उपेंद्र लिमये यांनी मुळशी पॅटर्नमध्ये साकारलेला पोलीस 'गन्स ऑफ नॉर्थ'मध्ये सलमान खान साकारण्याची शक्यता आहे. तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्नने धमाका केला. सिनेमा तुफान चालला. मुळशी भागात शेतजमिनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया या चित्रपटातून दिग्दर्शकाने मांडली. या सिनेमाची तुफान चर्चा झाली. यातलं आरारारार.. हे गाणंही गाजलं. ओम भूतकर, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, सविता मालपेकर आदींच्या यात भूमिका होत्या. हा सिनेमा मराठीसह अनेक अमराठी कलाकार, प्रेक्षकांनी पाहिला. त्यात होता सलमान खान. सलमानला हा सिनेमा खूप आवडला. मुळशी.. हिंदीत करायचा घाट त्याने घातला. आता तो बनणार आहे. या सिनेमाचं नाव निश्चित झालं असून, गन्स ऑफ नॉर्थ असं त्याचं नाव असेल, तर ओम भूतकरने साकारलेली भूमिका करेल सलमानच्या बहिणीचा, अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा. 'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे या सिनेमाचं नाव आधी धाक असं ठेवण्यात आलं होतं. पण आता ते बदलण्यात आलं. सिनेमाची सगळी तयारी पूर्ण झाली असून, एप्रिलमध्ये सिनेमाचं चित्रिकरण सुरू होणार होतं. पण, लॉकडाऊनमुळे हा बेत रद्द करावा लागला. आता लॉकडाऊन उठल्यानंतर या सिनेमाच्या चित्रिकरणाला वेग येणार आहे. आयुष शर्माने यापूर्वी लव्हयात्री हा सिनेमा केला होता. वारिना खान ही नायिका त्याच्यासोबत होती. लव्हयात्री तिकीटबारीवर फार काही करू शकला नाही. या चित्रपटाने आयुषला हातही दिला नाही. म्हणूनच सलमान खानने आपल्या आयुषसाठी मुळशी पॅटर्नची निवड केली आहे. आता त्याला आयुष किती न्याय देतो ते पाहावं लागेल. या सिनेमात सलमान खानही असणार आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार उपेंद्र लिमये यांनी साकारलेला पोलीस सलमान साकारण्याची शक्यता आहे. तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  मुळशी पॅटर्नने महाराष्टात मिळवलेलं यश पाहता या सिनेमाकडून मराठी जनांना अनेक अपेक्षा आहेत. विशेष बाब म्हणजे प्रवीण तरडेही या सिनेमाच्या जडणघडणीमध्ये महत्वाच्या जबाबदारीवर असणार आहेत. पण ते नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारतायत ते जाहीर करण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Embed widget