दीपिकाकडून एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर; पती रणवीरने केली 'ही' कमेंट
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणबीर कपूरसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला आहे. एवढचं नाहीतर दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंवर पती रणवीर सिंहने कमेंटही केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊनमुळे तर ती सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी शेअर करताना दिसत आहे. दीपिकाने सोशल मीडियावर दोन रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. आता तुम्हाला वाटेल की, दीपिकाने रणवीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अजिबात नाही, दीपिकाने आपला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. दीपिकाने शेअर केलेले हे फोटो जवळपास 7 वर्षांपूर्वीचे आहेत. हे फोटो चित्रपट 'ये जवानी है दीवानी' च्या चित्रिकणावेळचे आहेत. चित्रपटाला 7 वर्षा झाले असून याचनिमित्ताने दीपिकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंवर रणवीर सिंहनेही कमेंट केली आहे. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपट 31 मे 2013मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. हे फोटो शेअर करताना दीपिकाने तिची आवडती भूमिका असणाऱ्या नैना तलवारची एक लाइन लिहिली आहे. दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आमची पहिला लुक टेस्ट. यादें मिठाई के डिब्बे की तरह होती हैं...एक बार खुला, तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार. 'ये जवानी है दीवानी'चे सात वर्ष पूर्ण.'
रणवीर सिंहने केली कमेंट :
दीपिकाच्या या फोटोंवर रणवीर सिंहने 'क्यूट' अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड डिझाइनर मनीष मल्होत्राने हार्ट आणि स्माइली इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. दरम्यान, दीपिका आणि रणबीरने चित्रपट बचना ए हसीनो, ये जवानी है दीवानी आणि तमाशा यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यादरम्यान, या दोघांच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. ब्रेकअपनंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहने एन्ट्री घेतली आणि एकमेकांसोबत आपली लग्नगाठ बांधली.
संबंधित बातम्या :
प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन
रेल्वे स्टेशनवर मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला
हार्दिक पंड्या बाबा होणार! लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना दिली गुड न्यूज