एक्स्प्लोर
Advertisement
सैराट ढापला का? निर्मात्यांची चौकशी करा : कोर्ट
मुंबई : सैराट सिनेमाच्या निर्मात्यांची चौकशी करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने कामोठे पोलिसांना दिले आहेत. सैराट सिनेमाची कथा आपल्या बोभाटा कादंबरीवर बेतल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
सैराट चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे का, याची चौकशी आता होणार आहे. याप्रकरणाची चौकशी करुन 30 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
बोभाटाचे लेखक नवनाथ उर्फ नाथ माने यांनी निर्माती कंपनी एस्सेल ग्रुपने कॉपीराईट हक्काचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
नाथ माने यांचा दावा
‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीवरुन नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा ढापल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.
माने सध्या कामोठे परिसरात राहत असून मूळ साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. 2010 मध्ये त्यांनी ‘बोभाटा’ कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला आहे. मात्र वारंवार इमेलद्वारे संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावल्याचं म्हटलं आहे.
प्रकाशकांचं स्पष्टीकरण
दरम्यान, बोभाटा कादंबरी प्रकाशित करणाऱ्या संस्कृती प्रकाशनने मात्र हा दावा खरा नसल्याचं म्हटलं आहे. बोभाटा कादंबरी आणि सैराट सिनेमाच्या कथानकात मोठा फरक असल्याचं संस्कृती प्रकाशनच्या स्मिता राजे-पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रकाशकच लेखकाच्या दाव्याशी सहमत नसल्याचं दिसतंय.
संबंधित बातमी
'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement