एक्स्प्लोर
फेसबुक लाईव्हमध्ये अल्पवयीन मुलीला किस, गायक पॅपोन विरोधात तक्रार
पॅपोन सध्या &TV वर प्रसारित होणारा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया किड्स’ च्या दुसऱ्या पर्वात जजच्या भूमिकेत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन याच्या विरोधात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल झाली आहे. पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे या लहान मुलीला अशा पद्धतीने किस करणं चुकीचं असल्याचा आरोप पॅपोनवर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टातील वकील रुना भुयान यांनी ही तक्रार केली. पॅपोन सध्या &TV वर प्रसारित होणारा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया किड्स’ च्या दुसऱ्या पर्वात जजच्या भूमिकेत आहे.
शोच्या होळी स्पेशल एपिसोडच्या शुंटिंगनंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये मुलांसोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल झाला. या व्हिडीओतील प्रकारावर आक्षेप घेत वकील रुना भुयान यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल केली.
पॅपोनने अल्पवयीन मुलीसोबत जो प्रकार केला, तो अस्वस्थ करणारा आहे. व्हिडीओ पाहिल्यापासून या रिअॅलिटी शोमधील मुलांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटत असल्याचं रुना भुयान यांनी म्हटलं आहे.
मुलांसोबत सेलिब्रेशन करता करता पॅपोन एका मुलीला किस करताना व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. त्यानंतर पॅपोन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचा आदेश देतो. &TV वरील या शोमध्ये पॅपोनसोबत हिमेश रेशमिया आणि शानही जजच्या भूमिकेत आहेत.
&TV चं स्पष्टीकरण
शोमधील सर्व स्पर्धकांची काळजी घेणं आणि सर्व नियमांचं पालन करणं ही चॅनलची जबाबदारी आहे आणि ती घेतली जाते, असं स्पष्टीकरण &TV ने दिलं आहे.
मुलीच्या वडिलांचं स्पष्टीकरण
पॅपोन ही माझ्या मुलीसाठी वडिलधारी व्यक्ती आहे. यावर आमचा काहीही आक्षेप नाही. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे. माध्यमांनी हा व्हिडीओ दाखवू नये, अशी विनंती संबंधित मुलीच्या वडिलांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement