City Of Dreams 3 : राजकारणातील डावपेच, कोण जिंकणार? 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला!
City Of Dreams 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
City Of Dreams 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स' (City Of Dreams 3) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. ही सीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असल्याचं म्हटलं जात असून त्याबद्दल बोलताना एका मुलाखतीत अतुल कुलकर्णी म्हणाले की,"आम्ही दीड वर्षांआधी या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली. त्याआधी एका वर्षापूर्वी या सीरिजची संहिता लिहिली गेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित या सीरिजचं कथानक आहे असं वाटत आहे. पण तसं नसून आमच्या सीरिजवर भाष्य करणारं सध्याचं राजकारण आहे".
तगडी स्टारकास्ट असलेली 'सिटी ऑफ ड्रीम्स 3'
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि एजाज खान मुख्य भूमिकेत आहेत. नागेश कुकुनूरने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'सिटी ऑफ ड्रीम्स 3'मध्ये काय पाहायला मिळणार?
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' आजपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक पाहू शकतात. दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड पुन्हा एकदा सत्तेत आलेले प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत वेगवेगळे लढणारे गायकवाड यंदा मात्र एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे गायकवाड आणि इतरांमधील सत्तेसाठीचा संघर्ष या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
पहिल्या दोन सीझनमध्ये गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी होतं. सत्तेसाठी प्रियजनांची हत्या किंवा मुलीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात केलेला प्रवेश असो, या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्या आहेत. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये जगदीश गुरव आपली इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत.
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून या सीरिजचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या