एक्स्प्लोर
केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड
राजपूत करणी सेनेचे सदस्य शाळेत घुसले, त्यांनी म्युझिक सिस्टीम तोडली, प्लास्टिकच्या खुर्च्याही विद्यार्थी आणि पालकांवर भिरकावल्या, नोटीस बोर्डाच्या दोन काचाही फोडल्या, असा दावा मुख्याध्यापकांनी केला.
इंदूर : 'पद्मावत' चित्रपट रीलिज करण्यास हिरवा कंदील मिळाला असला, तरी वादंग काही केल्या शमताना दिसत नाही. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी 'पद्मावत' चित्रपटातील 'घूमर' गाण्यावर नृत्य केलं. मात्र यामुळे संतापलेल्या राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी शाळेची तोडफोड केली आहे.
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जाओरामध्ये सेंट पॉल शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं. त्यावेळी लोअर केजीतील विद्यार्थ्यांनी 'पद्मावत' चित्रपटातील गाजलेल्या 'घूमर' या गाण्यावर डान्स केला. याची माहिती मिळताच संतापलेल्या राजपूत करणी सेनेच्या आंदोलकांनी शाळा गाठली आणि तोडफोड केली.
‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर
जवळपास 24 ते 25 जणांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत शिरकाव केला. त्यामुळे चिमुरडे विद्यार्थी आणि पालकांसह शिक्षकांमध्येही घबराट पसरली. 'एका विद्यार्थ्याने काही गाण्यांवर पॅरडी केली होती. त्यातील एक गाणं म्हणजे घूमर या गाण्यातील एक भाग होता. मात्र आम्ही त्या विद्यार्थ्याला थांबवलं आणि ते गाणं न वाजवता पुढच्या गाण्यावर परफॉर्म करण्यास सांगितलं' असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं.'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल
राजपूत करणी सेनेचे सदस्य शाळेत घुसले, त्यांनी म्युझिक सिस्टीम तोडली, प्लास्टिकच्या खुर्च्याही विद्यार्थी आणि पालकांवर भिरकावल्या, नोटीस बोर्डाच्या दोन काचाही फोडल्या, असा दावा मुख्याध्यापकांनी केला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळावरुन पळून जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात महाराणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या 'घूमर' डान्समध्ये मोठा बदल केला आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे. ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी आहे. त्यामुळे या गाण्यात आवश्यक बदल करण्यास सांगितलं आहे. सेन्सॉर बोर्डासमोर जेव्हा सिनेमाची स्क्रीनिंग करण्यात आली, तेव्हा गाण्यात बदल करण्याची सूचना बोर्डाने केली होती. 'घूमर' गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकांची कंबर दिसत आहे, ती दृश्य हटवण्याची सूचना सीबीएफसीच्या विशेष समितीने निर्मात्यांना केली आहे. मात्र अशाप्रकारच्या एडिटिंगमुळे गाण्याची कोरिओग्राफी बिघडेल. त्यामुळे दीपिकाची कंबर ग्राफिक्सद्वारे लपवण्यासाठी दिग्दर्शक भन्साळी तयार झाले. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement