एक्स्प्लोर

Chhaya Kadam :  रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता छाया कदम दिसणार नव्या भूमिकेत, सिनेनिर्मितीत पदार्पण

Chhaya Kadam : अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम आता कारकिर्दीत नवी जबाबदारी पार पाडणार आहेत.

Chhaya Kadam :  दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी विविध चित्रपटात आपली छाप सोडली आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम आता  कारकिर्दीत नवी जबाबदारी पार पाडणार आहेत. छाया कदम या सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरत आहे.  'बारदोवी' या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. हा चित्रपट 2  ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

'बारदोवी' या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलेले आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे हे आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

चित्रपटाच्या पोस्टरवर शाल पांघरून करारी नजरेनं पाहणारी स्त्री दिसते. ही भूमिका छाया कदम यांनी साकारली आहेत. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया यांची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टरवरून व्यक्त केला जात आहे. छाया कदम यांची मुख्य भूमिका आणि त्यांची पहिलीच सहनिर्मिती असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gaja Marne Arrest : मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक, 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीIndrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखलBeed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवालDevendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
Embed widget