Charu Asopa : 'मी बाप्पाकडे प्रार्थना केली...'; चारुनं सांगितला राजीवसोबत केलेल्या पॅचअपचा किस्सा
नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन चारुनं राजीवसोबतच्या तिच्या नात्याबाबत सांगितलं.
Rajeev Sen,Charu Asopa : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजीव सेन आणि चारु असोपा (Charu Asopa) यांचा घटस्फोट होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. वेगवेगळ्या मुलाखतींमधून चारु आणि राजिव यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोघे लवकरच विभक्त होणार आहेत, असं म्हटलं जात होतं. चारु आणि राजीव हे पब्लिसीटी स्टंट करत आहेत, असं अनेकांचे मत होते. नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन चारुनं राजीवसोबतच्या तिच्या नात्याबाबत सांगितलं.
काय म्हणाली चारु?
चारुनं 21 सप्टेंबर रोजी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या 11 मिनीटांच्या व्हिडीओमध्ये तिनं राजीवसोबतच्या तिच्या नात्याबाबत चर्चा केली. तिनं व्हिडीओमध्ये सांगितलं, 'मी भिलवाडा येथून मुंबईला जाणार्या फ्लाईटमध्ये असताना बाप्पाकडे प्रार्थना करत होते. 31 ऑगस्टला गणपती बाप्पा येणार होता आणि 30 तारखेला मी आणि राजीव सही करण्यासाठी फॅमिली कोर्टात जाणार होतो. त्यामुळे 29 तारखेला फ्लाईटमध्ये बसल्यावर मी बाप्पाला माझ्या मनातली एकच गोष्ट सांगितली की बाप्पा मी तुला घरी आणणार आहे, म्हणून तुला आवडेल तसे कर. तुला माझ्या आणि जियानासाठी योग्य वाटेल तो निर्णय तू घे.'
'मी मुंबईला पोहोचले तेव्हा आणि 30 ऑगस्टच्या सकाळी आम्हाला फॅमिली कोर्टात जायचे होते. तेव्हा मी राजीव आणि मी बोलू लागलो आणि बोलत असताना अनेक अडचणी दूर झाल्या. जियाना आणि मी राजीवला खूप संधी दिल्या. त्यामुळे आम्ही राजीवला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मी खरं सांगते मी आत्तापर्यंत गणपतीला प्रार्थना केल्यावर माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत.' असंही चारुनं सांगितलं.
चारू आणि राजीव यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. जियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात.
पाहा व्हिडीओ: