एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chandrayaan 3 : आर. माधवनचा 'Rocketry' ते अक्षयचा 'Mission Mangal'; सिनेसृष्टी पोहोचली अंतराळात

Chandrayaan 3 Landing : 'चांद्रयान-3'चं आज लॅण्डिंग होणार असून भारतात या संदर्भात अनेक सिनेमांची निर्मिती झालेली आहे.

Movies Related to Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3' (Chandrayaan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. भारतासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. 'चांद्रयान-3' (Chandrayaan 3 Landing) आज चंद्रावर उतरणार असल्याने भारतीय नागरिक हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण भारतीय सिनेसृष्टीत अशापद्धतीच्या अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यात आर. माधवनच्या (R. Madhavan) 'रॉकेट्री' (Rocketry) ते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'मिशन मंगल' (Mission Mangal) सिनेमाचा समावेश आहे.

रॉकेट्री : द नंबी इफेक्ट (Rocketry : The Nambi Effect) :

आर. माधवन (R. Madhavan) दिग्दर्शित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्येष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायणन (Nambi Narayanan) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. नम्बी नारायणन यांचा ISRO चा प्रवास आणि त्यांचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 

मिशन मंगल (Mission Mangal) :

अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan), तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी आणि शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'मिशन मंगल' (Mission Mangal) हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 

कोई मिल गया (Koi Mil Gaya) :

'कोई मिल गया' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात हृतिक रोशन, प्रिती झिंटा, रेखा, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि जॉनी लिव्हर मुख्य भूमिकेत होते. एलियनचं भावविश्व या सिनेमात उलगडण्यात आलं आहे.

चाँद पर चढाई (Chand Par Chadayee) :

'चाँद पर चढाई' हा सिनेमा 1967 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टी.पी. सुंदरम यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात दारा सिंह, अनवर हुसैन, भगवान, जी रत्न आणि पद्म खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. हा वैज्ञानिक सिनेमा त्याकाळी खूप गाजला होता.

टिक टिक टिक (Tik Tik Tik) :

'टिक टिक टिक' हा तामिळ सायंस फिक्शन सिनेमा आहे. 2018 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'अंतरिक्षम 9000 kmph' (Antariksham 9000 kmph) :

'अंतरिक्षम 9000 kmph' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संकल्प रेड्डी यांनी सांभाळली आहे. या सिनेमात वरुण तेज आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. 

रॉकेट बॉईज (Rocket Boys) :

'रॉकेट बॉईज' ही वेब सीरिज होमी. जे. भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अभय पन्नू यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 

संबंधित बातम्या

Chandrayaan 3 : 'चांद्रयान 3' मोहीम आज इतिहास रचणार..अभिमानाचा क्षण! अमिताभ बच्चन ते करीना कपूर; बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'ISRO'ला दिल्या शुभेच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde FULL PC :  महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदेDevendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारTop 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या  Maharashtra PoliticsABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9AM 29 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Embed widget