Chaityabhumi: दिग्दर्शक पा. रंजीत यांनी मराठमोळ्या तरुणाच्या 'चैत्यभूमी' या डॉक्युमेंट्रीची केली निर्मिती; शेअर केला ट्रेलर
चैत्यभूमी (Chaityabhumi) ही डॉक्युमेंट्री नीलम प्रोडक्शनच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळणार आहे.
Chaityabhumi: काला, कबाली, मद्रास यासारखे प्रसिद्ध सिनेमे करणारा दिग्दर्शक पा रंजीत (Pa.Ranjith) यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे पीएचडी करणाऱ्या सोमनाथ वाघमारे या युवकाने बनवलेल्या चैत्यभूमी (Chaityabhumi) या डॉक्युमेंट्रीची दखल घेतली आहे. या डॉक्युमेंटरीची स्क्रिप्ट ऐकल्यानंतरच पा. रंजीत यांनी आपण या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करू असं आश्वासन सोमनाथ वाघमारे यांना दिलं होतं. त्यानुसार आता ही डॉक्युमेंटरी तयार झाली असून नुकतंच या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर पा.रंजीत यांच्या नीलम प्रोडक्शन हाऊस या ट्वीटर हँडल वरून शेअर करण्यात आला आहे. ही डॉक्युमेंट्री नीलम प्रोडक्शनच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळणार आहे.
चैत्यभूमी या डॉक्युमेंट्रीबाबत बोलताना दिग्दर्शक पा. रंजीत म्हणाले की, सोमनाथ वाघमारेच्या चैत्यभूमी या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करताना आम्हाला आनंद होत असून या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच महत्त्व आणि एकूण सांस्कृतिक राजकारण याचा उलगडा झाल्याचे पाहायला मिळेल.
पा. रंजीतची पोस्ट
Neelam Productions proudly presents the trailer of @Somwaghmare's documentary film 'Chaityabhumi'. 💙
— pa.ranjith (@beemji) December 3, 2022
⏩ https://t.co/TX1Jm6RTVv
This documentary brings to light the history and cultural politics of how people commemorate Dec 6 at Chaityabhumi. @officialneelam @NeelamSocial pic.twitter.com/2jK9icD4v0
पाहा चैत्यभूमी चित्रपटचा ट्रेलर:
चैत्यभूमी या डॉक्युमेंट्रीबाबत बोलताना दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे म्हणाले की, भारतातील दलित चळवळीसाठी, मुंबईतील चैत्यभूमी हे महत्त्वाचे असे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील दलित चळवळ 100 वर्षांपासून अखंडपणे अस्तित्वात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातविरोधी आणि दलित मानवाधिकार चळवळीची सुरुवात याच भूमीतून झाली होती. परंतु चित्रपट माध्यमात कायमच आंबेडकर विषयी चळवळीला बगल देण्यात आल्याचे पाहायला मिळतं म्हणूनच हा माहितीपट बनवण्यात आला आहे. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य यासोबतच शिवाजी पार्क मैदान याचं जातीय राजकारण 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: