एक्स्प्लोर
CCTV : अभिनेत्रीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

मुंबई: मुंबईत भटक्या कुत्र्यांनी किती धुडगूस घातला, याचं भयावह चित्र अंधेरीतून समोर आलं. 23 जानेवारीला अंधेरी भागात दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिच्या हातासह चेहऱ्यावर चावा घेतला.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. पारुल यादवसोबत तिचा पाळीव कुत्रा होता. त्याच्यासोबत इमारतीच्या आवारातून ती घरी जात होती. त्याचवेळी 4 ते 5 कुत्र्यांनी तिच्या कुत्र्यासह तिच्यावर हल्ला केला.
सध्या पारुल यादववर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
VIDEO: मुंबई: अभिनेत्री पारुल यादवला कुत्र्यांचा चावा, सीसीटीव्ही व्हि़डिओ उजेडात
पारुल यादवनं दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच काही हिंदी मालिकांमधूनही अभिनय केला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.त्यावर भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
