एक्स्प्लोर

Cannes Film Festival : 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची निवड

Cannes Film Festival : 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

Cannes Film Festival : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित 'जिप्सी', श्रीकांत भिडे दिग्दर्शित "भेरा" आणि मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिली.

फ्रान्स देशातील कान येथे 14 ते 22 मे 2024 या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. महामंडळामार्फत सन 2016 पासून कान  महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठविले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. निवड झालेल्या तिन्ही चित्रपटांच्या चमूचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षी एकूण 23 चित्रपटांचे प्रवेश प्राप्त झाले होते. त्यातून तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 

या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. या समितीमध्ये श्रीकांत बोजेवार, रसिका आगाशे, अर्चना बोऱ्हाडे, क्षितिजा खंडागळे, संदीप पाटील यांचा समावेश होता. या समितीने तिन्ही चित्रपटांची निवड एकमताने  केली. 

निवड झालेला जिप्सी या चित्रपटाची निर्मिती 'बोलपट' या निर्मिती संस्थेने केली आहे. भेरा या चित्रपटाची निर्मिती 'वैजप्रभा चित्र निर्मिती' या संस्थेने केली आहे. तर 'स्पेसटाइम एंटरटेंमेंट' या चित्रपट निर्मितीसंस्थेने वल्ली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 चित्रपटांचा संक्षिप्त कथासार 

जिप्सी

"जिप्सी" ही आयुष्यभर दिशाहीनपणे भटकणाऱ्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट आहे. 'जोत्या' या लहान मुलाला रोज भीक मागून आणलेले खराब, शिळं अन्न खावं लागत असल्याने त्याला ताज्या-गरमागरम पदार्थांचे खूप आकर्षक आहे. पण त्याला तसं खायला मिळत नसल्याने नेहमीच त्याला केवळ वासावरच भगवावं लागतं. यातून त्याला पदार्थांचे वास घ्यायची सवय लागते. तर दुसऱ्या बाजूला गरोदरपणातही भटकावं लागत असल्याने त्याच्या आईचा एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे जोत्याला एका पदार्थाचा वास भारावून टाकतो. आणि शेवटी हा वासच त्याला आयुष्य बदलण्याची संधी देतो.

वल्ली

कथेचा नायक वल्ली, हा जोगता परंपरेचा अनुयायी आहे- प्राथमिक पुरुषाच्या शरीरात जन्मलेला आणि बहुरूपाने स्वतःला स्त्री म्हणून दर्शवणारा व्यक्ती. या दशकभरात, वल्लीला जाणवते की त्याचा खरा पुरुषार्थ अत्यंत उपेक्षित राहीलाय. शारिरीक हल्ले, सामाजिक उपहास आणि सार्वजनिक छळ सहन करत, वल्ली परंपरेच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतो आणि शहरी जीवनातील कठोर वास्तवांना तोंड देण्यासाठी तारासोबत प्रवास सुरू करतो.

भेरा

‘भेरा’ही कोविड काळात तळ कोकणातल्या एका दुर्गम गावात घडणारी 2 निष्पाप जीवांची कथा आहे. गावात मुख्य वस्तीपासून लांब एकटी राहणारी अनिबाई, जी कोविड काळात मुंबईमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाची म्हणजेच सुरेशची आतुरतेने वाट पाहते आहे. अपेंडिक्सच्या त्रासाने त्रस्त अनिबाईला उरलेल्या जगाशी जोडणारा एकमेव दुवा म्हणजे जन्मतःच मूक बधीर असणारा विष्णू. अनाथ विष्णू जो आपल्या मामा घरी गुलामासारखा राहतो पण मायेसाठी आसुसलेला अनिबाईकडे आपुलकी पोटी येतो. 

अनिबाई कुठे आहे याचा काहीही अंदाज नसलेला आणि एकीकडे आपल्या मित्राची सुरेशची वाट पाहणारा विष्णू अजूनच बिथरतो. याच अवस्थेत अचानक एक दिवस सरपंच सुरेशच्या अस्थी घेऊन अनिबाईच्या घरी येतो आणि पर्याय नसल्याने त्या विष्णूकडे सुपूर्त करतो. परिस्थितीने हतबल विष्णू ज्याच्यासाठी सगळी धडपड केली तो मित्र कायमचा सोडून गेला या धक्क्यात एकटाच अनिबाईची वाट बघत राहतो.

संबंधित बातम्या

Cannes Film Festival : कौतुकास्पद! अनुराग कश्यपच्या 'कॅनेडी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं 'स्टँडिंग ओव्हेशन'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025Buldhana Farmer Death | पाण्याच्या संघर्षाला कंटाळून शेतकरी कैलास नागरे यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 13 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सNana Patole PC | Parinay Fuke यांचा विधीमंडळ प्रश्मांचा 'एजंट बाँब', नाना पटोलेंचा पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Embed widget