एक्स्प्लोर
तंबाखूच्या जाहिराती करणे सोड, कॅन्सर पीडित चाहत्याचं अजय देवगणला साकडं
बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण आपल्याला तंबाखूच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसतो, परंतु अजयच्या एका चाहत्याने त्याला तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करु नको, असे आवाहन केले आहे.
जयपूर : 'तंबाखू आणि त्याच्या उत्पादनांची जाहिरात करणे सोडून दे', असे आवाहन अजय देवगणच्या एका कॅन्सर पीडित चाहत्याने केले आहे. नानकराम मीणा (40) असे या अजयच्या चाहत्याचे नाव असून ते राजस्थानमधील जयपूरमध्ये राहतात. अजय देवगणची तंबाखू उत्पादनाची (गुटखा) जाहिरात पाहून नानकरामनेही गुटख्याचे सेवन सुरु केले. परंतु यामुळे नानकरामला कॅन्सर झाला आहे. त्यामुळेच अजयने तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करु नये, असे नानकराम यांना वाटते.
नानकराम यांच्याप्रमाणे अनेकांनी अजयची जाहिरात पाहून गुटख्याचे सेवन सुरु केले आहे. आपल्याप्रमाणे इतरांना कॅन्सर होऊ नये, यासाठी नानकरामने अजय देवगणला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करु नये, अशी विनंती केली आहे.
नानकराम यांनी जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि आसपासच्या परिसरात एक हजार पत्रके वाटली आणि भितींवर चिकटवली आहेत. यामध्ये तंबाखू आणि तंबाखूच्या पदार्थांचे सेवन केल्याने होणारे परिणाम, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेली परिस्थिती याबाबतची माहिती दिली आहे. तसेच या पत्रकाद्वारे नानकराम यांनी अजय देवगणला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहीरात करु नको, असे आवाहनही केले आहे.
नानकराम यांचा मुलगा दिनेश म्हणाला की, "माझे वडील अजय देवगणचे खूप मोठे चाहते आहेत. अजय तंबाखूच्या ज्या उत्पादनांची जाहिरात करतो, माझे वडील त्याच उत्पादनांचे सेवन करतात. काही दिवसांनी त्यांना कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अजय देवगणसारख्या अभिनेत्याने तंबाखूची जाहिरात करु नये असे माझ्या वडिलांना वाटते."
दिनेश म्हणाला की, माझ्या वडिलांना असे वाटते की, "त्यांच्याप्रमाणे अजयचे लाखो चाहते आहेत, त्यांनीसुद्धा तंबाखूचे सेवन केले, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement