(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'नं 200 कोटींचा टप्पा केला पार; दहाव्या दिवशी केली 'एवढी' कमाई
रविवारी (18 सप्टेंबर) ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली असून लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
Brahmastra Box Office Collection Day 10 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’(Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. रविवारी (18 सप्टेंबर) ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली असून लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
रविवारी म्हणजेच दहाव्या दिवशी या चित्रपटानं 16.25 ते 17.25 कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 40 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटानं 209 ते 210 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 360 कोटींची कमाई केली आहे.
आलियाचे चित्रपट ठरले हिट
2022 हे वर्ष आलियासाठी खास होते. या वर्षी तिचे आरआरआर, गंगूबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र हे तीन चित्रपट रिलीज झाले. या तिन्ही चित्रपटांनी 200 कोटींपेक्षा जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.
ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत.
ब्रह्मास्त्र-2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस
अयाननं ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत देखील सांगितलं. दोन वर्षांनी म्हणजेच 2025 मध्ये ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी माहिती अयाननं दिली होती. चित्रपटातील VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते. या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :