![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Boyz 4 : 'बॉईज 4'ची दिवाळी स्पेशल ऑफर; फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट
Boyz 4 : 'बॉईज 4' हा सिनेमा सिनेरसिकांना फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा यासाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे.
![Boyz 4 : 'बॉईज 4'ची दिवाळी स्पेशल ऑफर; फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट Boyz 4 Diwali 2023 Special Offer Special Diwali offer now enjoy boyz 4 only for rs 99 know details Parth Bhalerao Gaurav More Marathi Movie Entertainment Latest Update Boyz 4 : 'बॉईज 4'ची दिवाळी स्पेशल ऑफर; फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/8137a56a77498304f8bd09f55269035b1699429767258254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Boyz 4 : 'बॉईज 4' (Boyz 4) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक सिनेमागृहात या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'बॉईज 4' हा सिनेमा सिनेरसिकांना फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा यासाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे.
'बॉईज 4'चे निर्माते राजेंद्र शिंदे एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले,"मराठी प्रेक्षकांनी 'बॉईज' (Boyz), 'बॉईज 2' (Boyz 2) आणि 'बॉईज 3' (Boyz 3) प्रमाणे 'बॉईज 4'लाही (Boyz 4) उदंड प्रतिसाद दिला आहे. आता 'बॉईज 4' हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा म्हणून आम्ही 99 रुपयांची ऑफर प्रेक्षकांसाठी ठेवली आहे".
बॉईज आर बॅक...
धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॉईज 4' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या सिनेमात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे.
View this post on Instagram
'बॉईज 4'बद्दल जाणून घ्या... (Boyz 4 Movie Details)
'बॉईज 4' या सिनेमाचं लेखन हृषिकेश कोळीने केलं असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सखाराम देवरुखकरने सांभाळली आहे. एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणे, असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक 'बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'बॉईज 4' हा सिनेमा आता बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.
शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. दरवेळी प्रमाणे हा 'बॉईज' ही एक नवीन गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉईज हा सिनेमा 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2018 मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज झाला. बॉईज 3 हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. आता बॉईज 4 हा सिनेमा 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
संबंधित बातम्या
Boyz 4 Box Office Collection: "बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार!; 'बॉईज 4' नं दहा दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)