राज कुंद्राचे आपल्या पहिल्या पत्नीवर 12 वर्षांनंतर धक्कादायक आरोप, शिल्पा शेट्टी नाराज
शिल्पाची इच्छा नव्हती की राजने आपल्या पहिले लग्न आणि घटस्फोटाविषयी मोकळेपणाने बोलावे. पण राज सहमत नव्हते आणि मुलाखतीत आपली बाजू ठेवून त्याने बर्याच गोष्टींकडून पडदा उठविला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच राजने आपली पूर्वाश्रमीची पत्नी कविता कुंद्रासोबत झालेल्या तुटलेल्या विवाहाबद्दल काही खळबळजनक खुलासे केले आहेत. शिल्पाची इच्छा नव्हती की राजने आपल्या मागील विवाह आणि घटस्फोटाविषयी सार्वजनिकपणे इतके उघडपणे बोलावे. परंतु, राज सहमत नव्हते आणि मुलाखतीत आपली बाजू ठेवून त्याने बर्याच गोष्टी उघड केल्या असल्याचे पिंकव्हिलाने सांगितले आहे.
शिल्पाच्या नाराजीसंदर्भात राज यांनी स्वतः एका नवीन मुलाखतीत म्हटले होते की, “जेव्हा मी माझी पूर्वाश्रमीची पत्नी कविता हिच्या जुन्या मुलाखतीची व्हायरल क्लिप शिल्पाला पाठविली तेव्हा मी याविषयी बोल नये अशी तिची इच्छा होती.” या लेखाचा व्हायरल टाइमिंग हा शिल्पाच्या वाढदिवसाच्या आसपास होता, "ज्याने मला खूप अस्वस्थ केले आणि मी माझ्या आतला भावनांना वाट करुन दिली. तसे करणे आवश्यक होते. कारण सत्य बाहेर आले पाहिजे." मात्र, यामुळे शिल्पा खूप नाराज होती.

तो पुढे म्हणाला की, 12 वर्षानंतर बोलणे आवश्यक होते आणि मी गप्प बसू शकत नव्हतो. जेव्हा अशा गोष्टींमध्ये आपले कुटुंब अडलेले असेल तेव्हा आपण सत्य दाबू शकत नाही. बर्याच वर्षांनंतर, सत्य बोलून मला खूप हलकं वाटतंय. माझ्या आईने माझी पूर्वाश्रमीची पत्नी आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्याला अनेकदा आक्षेपार्ह परिस्थितीत पकडले होते. दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि दोघांनीही अशी कृती करताना एकदाही विचार केला नाही.
राज यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याची पहिली पत्नी कविता कुंद्राचा तिच्या मेहुण्याशी म्हणजेच राजच्या बहिणीच्या नवऱ्याशी प्रेमसंबंध होते. हे उघड झाल्यानंतर राज यांनी कविताला घटस्फोट दिला. दुसरीकडे कविताने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आरोप केला होता की शिल्पामुळेच तिचे आणि राज यांचे लग्न मोडले आहे. शिल्पाने सांगितले होते की 2006 मध्ये कवितापासून घटस्फोट घेताच राजशी तिची भेट झाली होती.























