(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#BoycottBollywood पुन्हा ट्रेंडमध्ये; सुशांतच्या मृत्यूला होतंय एक वर्ष, #kartikAaryan ट्विटरवर पुन्हा जोमात
14 जूनला सुशांतच्या जाण्याला वर्ष होतं आहे. पण त्यापूर्वी कार्तिक आर्यनमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि त्यातल्या गटबाजीचे खेळ लोकांचं रंजन करू लागले आहेत. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ला सुरुवातीला करण जोहरच्या धर्माची निर्मिती असलेल्या दोस्ताना 2 मधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर अजय बहल दिग्दर्शित गुडबाय फ्रेडी या सिनेमातून कार्तिकची गच्छंती झाली.
मुंबई : गेल्या 14 जूनला भारतीय सिनेसृष्टीला, सिनेप्रेमींना एक मोठा धक्का बसला. सगळं आलबेल असताना संपूर्ण भारत लॉकडाऊनच्या झळा सोसत असतानाच 14 जूनला दुपारी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणि बातमी समजल्यानंतर प्रत्येकजण जागच्या जागी खिळून राहिला होता. बातमी होतीच तशी. बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा सर्वसामान्य लोकांचा नायक बनू पाहणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्याची ती बातमी होती. बघता बघता या घटनेला वर्ष होईल. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती की, ती हत्या होती यावर त्यानंतर जवळपास 6 महिने खल चालला. अजूनही त्या तपासातून निष्कर्ष बाहेर यायचा आहेच. पण असं असतानाच आता सुशांतची आठवण सिनेप्रेमींना पुन्हा आली आहे ती कार्तिक आर्यनमुळे. पुन्हा एकदा बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे.
14 जूनला सुशांतच्या जाण्याला वर्ष होतं आहे. पण त्यापूर्वी कार्तिक आर्यनमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि त्यातल्या गटबाजीचे खेळ लोकांचं रंजन करू लागले आहेत. कार्तिक आर्यनला सुरुवातीला करण जोहरच्या धर्माची निर्मिती असलेल्या दोस्ताना 2 मधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर अजय बहल दिग्दर्शित गुडबाय फ्रेडी या सिनेमातून कार्तिकची गच्छंती झाली. या दोन्ही सिनेमातून बाहेर पडताना क्रिएटिव्ह डिस्प्युट असं नाव त्याला देण्यात आलं आहे. ही बातमी समजते न समजते तोच आनंद. एल. राय यांच्या सिनेमातूनही तो बाहेर पडत असल्याच्या बातम्या आल्या. अर्थात, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचा निर्वाळा आनंद. एल. राय यांच्या कंपनीने दिला आहे. कार्तिकच्या जागी आयुषमान खुराना काम करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यावर आयुषमानचा सिनेमा पूर्ण वेगळा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या गोष्टी होत असल्या तरी कार्तिक आर्यनला सिनेमातून काढण्याने सुशांत सिंह राजपूत प्रेमींची जखम पुन्हा एकदा ओली झाली आहे. कार्तिक आर्यनचे चाहते आणि सुशांत सिंह राजपूतचे चाहते आता सोशल मीडियावर एक होऊ लागले आहेत. यात हॅशटॅग कार्तिक आर्यन ट्रेंड होऊ लागला आहे. तर दुसरीकडे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंडही पुन्हा जोरावर आहे.
कार्तिक आर्यनला सिनेमातून काढल्याच्या बातम्या आल्यानंतर ट्विटरवर नेटकऱ्यांनी कार्तिक आर्यनलला आपला पाठिंबा दिलेला दिसतो. यातूनच वेगवेगळे हॅशटॅग तयार झाले आहेत. सुशांत गेल्यानंतर बॉलिवूडच्या गटबाजीवेळी ज्या ज्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या, त्या सगळ्यांची आठवण पुन्हा करून दिली जाताना दिसतेय. इतकंच नव्हे, तर कार्तिक आर्यनने माझ्या चाहत्यांचा मी फॅन आहे असं एकदा ट्विट केलं होतं ते ट्विटही व्हायरल होऊ लागलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने सामान्य घरातला कष्टातून वर आलेला एक नायक आपण गमावला आहे. आता कार्तिक आर्यनबाबतही असं काही घडु नये अशी इच्छा अनेक लोक बोलून दाखवू लागले आहेत. इतकंच नव्हे, तर कार्तिकच्या ज्या क्रिएटिव्ह मतांतरांबद्दल बोललं जाऊ लागलं आहे, त्यावेळी कार्तिक असे निर्णय का घेतोय असा सवाल सिनेअॅनालिस्ट तरण आदर्श यांनीही विचारला आहे. 14 जून जसा जवळ येईल तशी नेटवर पुन्हा एकदा बॉलिवूडबद्दलचा लपलेला द्वेष उफाळून येईल. सध्या कार्तिक त्याचं निमित्त ठरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :