(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT This Week : बोमन ईरानी करणार ओटीटीवर पदार्पण; 'या' आठवड्यात 'मासूम'सह 'She 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
OTT : या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर दोन वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.
OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (ott) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील दोन वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. यात 'शी 2' आणि 'मासूम' या वेबसीरिजचा समावेश आहे.
प्रेक्षक सध्या सिनेमांपेक्षा वेबसीरिजला पसंती दर्शवत आहेत. प्रत्येक आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात आशिकाना, मिस मार्वल, अर्ध, कोड एम सीझन 2, ब्रोकन न्यूजसारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर या आठवड्यात बहुचर्चित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'शी 2' आणि 'मासूम' या दोन्ही सीरिज 17 जूनलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शी 2
कधी होणार प्रदर्शित? 17 जून
कुठे पहायला मिळणार? नेटफ्लिक्स
शी 2 (She 2) : 'आश्रम' या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता आदिती पोहनकर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इम्तियाज अली यांनी 'शी' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या लेखनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये आदिती पोहनकरने भूमिका परदेशी उर्फ भूमि नावाचे पात्र साकारले आहे. ही वेबसीरिज 17 जूनला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मासूम
कधी होणार प्रदर्शित? 17 जून
कुठे पहायला मिळणार? डिज्नी प्लस हॉटस्टार
मासूम (Masoom) : 'मासूम' या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. बोमन ईरानींना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ही सीरिज पंजाबच्या फलौलीवर आधारित आहे. कपूर कुटुंबियांवर भाष्य करणारी ही सीरिज आहे. मिहिर देसाईने या वेबसीरिजचे दिग्दर्शन केलं आहे. 'मासूम' ही सीरिज 17 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या