एक्स्प्लोर
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात बोमन इराणी साकारणार रतन टाटा यांची भूमिका
पंतप्रधान मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारणार आहे. तर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भूमिका बोमन इराणी करत आहेत. शिवाय बोमन इराणी यांनी चित्रपटातील रतन टाटा यांच्या भूमिकेचं चित्रीकरणही पूर्ण केल्याची माहिती आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भूमिका अभिनेता बोमन इराणी साकारणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग रविवारपासून अहमदाबादमध्ये सुरु झालं आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार करणार आहेत. तर सुरेश ओबेरॉय या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारणार आहे. तर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भूमिका बोमन इराणी करत आहेत. शिवाय बोमन इराणी यांनी चित्रपटातील रतन टाटा यांच्या भूमिकेचं चित्रीकरणही पूर्ण केल्याची माहिती आहे. 'मी रतन टाटा यांच्यासारखा दिसतो, असं अनेकदा लोक मला सांगायचे, शिवाय सोशल मीडियावरही अशा कॉमेंट्स यायच्या. तेव्हापासून मला असं वाटायचं की मला रतन टाटा यांची भूमिका साकारायला मिळावी. दिग्दर्शक ओमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय यांनी जेव्हा मला या भूमिकेसाठी फोन केला, तेव्हा मी लगेच होकार दिला', अशी प्रतिक्रिया अभिनेता बोमन इराणी यांनी दिली.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















