एक्स्प्लोर
भारताच्या पराभवानंतर खेळाडूंना धीर देण्यासाठी 'खिलाडी' मैदानात
विश्वचषकातील कठीण मेहनतीनंतर अखेरच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. यावेळी पराभवाने निराश झालेल्या महिला खेळाडूंना धीर देण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मैदानात गेला.

लंडन : मिताली राजच्या भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर नऊ धावांनी अधुरं राहिलं. लॉर्डसवरच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडने भारतावर मात करून चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. विश्वचषकातील कठीण मेहनतीनंतर अखेरच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. यावेळी पराभवाने निराश झालेल्या महिला खेळाडूंना धीर देण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मैदानात गेला. हृदय तुटलेलं असेल तरीही हसू शकता. या महिलांनी क्रांतीची सुरुवात केली आहे, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. त्याने महिला खेळाडूंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. https://twitter.com/akshaykumar/status/889187425158926336 महिला विश्वचषकाचा फायनल पाहण्यासाठी उशीर ट्रॅफिकमध्ये अडकून उशीर होऊ नये यासाठी अक्षय कुमार ट्रेनने रवाना झाला. यावेळी त्याने स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला होता. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा गोल्डच्या शुटिंगसाठी इंग्लंडमध्येच आहे. शुटिंगमधून वेळ काढून अक्षय कुमार महिला विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी गेला होता.
आणखी वाचा























