एक्स्प्लोर

मुलीसाठी बाप बनला 'खुनी'; डोकं सुन्न करतं 'या' चित्रपटाचं धमाकेदार कथानक, IMDb वर जबरदस्त रेटिंग!

Bollywood Suspense Movie : एक बाप आपल्या मुलीच्या रक्षणासाठी आणि तिच्या हातून नकळतपणे झालेल्या खून लपवण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घालतो? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

Bollywood Suspense Thriller Movie : वडील आणि मुलीचं नातं आपल्या सर्वांना माहीत आहेच... बाप-लेकीच्या नात्यात एक खास बॉन्ड असतो. जो शब्दात सांगू शकतच नाही. या नात्यावर अनेक अप्रतिम चित्रपट आणि वेब सिरीज (Web Series) बनवण्यात आल्या आहेत. आज अशाच धमाकेदार वेब सीरिजबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन पार्ट रिलीज झाले आहेत. आता, प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. निशिकांत कामत (Nishikant Kamat) दिग्दर्शित हा चित्रपट 2013 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड कमाई केली. एक बाप आपल्या मुलीच्या रक्षणासाठी आणि तिच्या हातून नकळतपणे झालेल्या खून लपवण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घालतो? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात बॉलिवूडची (Bollywood) मोठी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. अजय देवगण (Ajay Devgn), तब्बू (Tabu), श्रेया सरन (Shriya Saran) आणि इशिता दत्ता (Ishita Dutta) हे स्टार्स या चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहेत.

बॉलिवूडचा गाजलेला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट

आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल आम्ही कोणत्या चित्रपटाबाबत बोलत आहोत. आम्ही बॉलिवूडचा सुपरडुपर हिट चित्रपट दृश्यमबाबत बोलत आहोत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अजय देवगण आहे. आपल्या मुलीच्या हातून झालेला खून लपवण्यासाठी एक बाप काय-काय करू शकतो, याचं चित्र या चित्रपटात करण्यात आलं आहे. 

या चित्रपटात एका वडिलांनी दाखवून दिलं आहे की, आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट आलं तर तो बाप त्या सर्व संकटांना सामोरं जाण्यासाठी सदैव तत्पर असतो. तो वेळ पडली तर कोणत्याही थराला जाऊ शकतो, पण आपल्या कुटुंबाला त्यातून वाचवतो.  अजय देवगण आणि श्रेया सरन यांचा 'दृश्यम' चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सनं भरलेले अजयचे चित्रपट लोकांना आवडतात आणि त्यापैकीच एक असलेल्या 'दृश्यम' ला तर लोकांनी डोक्यावर घेतलं. 'दृश्यम' हा तर सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट मानला जातो. अजयच्या या चित्रपटानं रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक असूनही 'दृश्यम'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. 

क्राईम, सस्पेन्सनं भरलेला धमाकेदार चित्रपट कुठे पाहाल? 

अजय देवगणचा 'दृश्यम' OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. या क्राईम थ्रिलरला 8.3 चे IMDb रेटिंग मिळालं आहे. 'दृश्यम'चं दिग्दर्शनही निशिकांत कामत यांनीच केलं होतं. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तुम्ही या वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता.

अजय देवगणचा धमाका

अजय देवगण सध्या 'सिंघम अगेन'मुळे चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ दिसणार आहेत. अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, हा चित्रपट आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. तो म्हणजे, बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा कॅमिओ. सिंघम अगेनमध्ये सलमान खान चुलबुल पांडेच्या अंदाजात कॅमिओ करणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अॅक्शनचा तडका, सेस्पेन्सचा मसाला अन् हादरवणारा Climax; साऊथचा 'हा' चित्रपट नाही पाहिली तर काय पाहिलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget