एक्स्प्लोर

बॉलीवूडच्या सुपरस्टारला पाहण्यासाठी एवढी गर्दी उसळली की पॅरामिलिटरी फोर्स बोलवावी लागली, पुणे शहर 7 तास ठप्प झालं

त्यांच्या स्मितहास्यावर आणि रोमॅंटिक अंदाजावर चाहत्यांची भुरळ पडली होती. आज, त्यांच्या निधनानंतर दशक उलटलं असलं तरी त्यांचं नाव उच्चारलं की लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटतं.

Bollywood : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ज्यांना ‘पहिला सुपरस्टार’ मानलं जातं, त्या राजेश खन्नांच्या (Rajesh Khanna) लोकप्रियतेचा अंदाज लावणं अवघड आहे. ज्या प्रमाणात लोक त्यांच्यावर फिदा झाले, तसा स्टारडम आजवर कुणालाही मिळाला नाही. एकदा तर त्यांच्या चाहत्यांनी पुणं शहरच ठप्प करून टाकलं होतं! चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सला बोलवावं लागलं होतं.

राजेश खन्नांना पाहताच एकच गर्दी उसळली 

60-70च्या दशकात राजेश खन्नांचा जबरदस्त दबदबा होता. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजित पुरी यांनी या घटनेचा किस्सा सांगितला. सत्यजित पुरी त्या काळातील प्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट होते आणि त्यांनी राजेश खन्नासोबत अनेक चित्रपट केले होते. पुरी म्हणाले, “राजेश खन्नांचा कॉल टाइम दुपारी 2 वाजता होता, पण ते सेटवर रात्री 8 वाजता पोहोचले. शक्ति सामंत सर रागाने संतापले आणि म्हणाले, ‘काका, तू काय आता मोठा स्टार झालास का?’ त्यावर राजेश खन्नांनी हसत आपल्या ड्रायव्हरकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, ‘त्याला विचारा काय झालं!’”

ड्रायव्हरने सांगितलं, “काका दुपारी साडेबारा वाजता पुण्यात पोहोचले, पण त्यांच्या आगमनाची बातमी समजताच रस्त्यावर गर्दी उसळली. हजारो चाहते रस्त्यावर उतरले, काही मुली गाडीच्या टायरलाच लटकल्या. शहरात ट्रॅफिक जाम झाला  परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पॅरामिलिटरी फोर्सला बोलवावं लागलं. त्या दलानेच काकांना सुरक्षित बाहेर काढलं.” तेव्हा राजेश खन्ना म्हणाले होते, “मी आता पोहोचलोय, हेच नशीब समजा. अन्यथा मी रात्री 11 वाजेपर्यंतही इथे येऊ शकलो नसतो.”

शेवटच्या प्रवासातही जमली लाखोंची गर्दी

राजेश खन्नांचं 2012 मध्ये दीर्घ आजारानंतर निधन झालं. त्यांच्या यकृतामध्ये इन्फेक्शन झालं होतं. ‘काका’च्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इतकी गर्दी जमली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यांच्या स्टारडमचा तो शेवटचा पुरावा ठरला. कारण मृत्यूनंतरही लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आदर होता.‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’सारख्या हिट चित्रपटांनी राजेश खन्ना यांनी लाखोंच्या मनात घर केलं. त्यांच्या स्मितहास्यावर आणि रोमॅंटिक अंदाजावर चाहत्यांची भुरळ पडली होती. आज, त्यांच्या निधनानंतर दशक उलटलं असलं तरी त्यांचं नाव उच्चारलं की लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Genelia and Riteish Deshmukh: 'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
Shraddha Kapoor Kolhapur: 'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
Hanuman Ansh OTT: 'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार
'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Embed widget