Bollywood Movie : चंदेरी दुनियेची पडद्यामागची गोष्ट; 'हे' चित्रपट पाहिलेत का?
Bollywood Movie : कलाकारांच्या दुनियेची पडद्यामागची गोष्ट दाखवणारे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

Bollywood Movie : ग्लॅमर (Glamour) आणि फेम (Fame) या गोष्टींमुळे चित्रपटसृष्टीकडे अनेक लोक आकर्षित होतात. चित्रपटसृष्टीच्या या चंदेरी दुनियेचे दोन चेहरे आहेत. कलाकारांच्या दुनियेची पडद्यामागची गोष्ट दाखवणारे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. पाहूयात कोणत्या चित्रटांनी चंदेरी दुनियेची 'डार्क साइड' प्रेक्षकांना दाखवली.
फॅशन (Faishon)
फॅशन या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रानं प्रमुख भूमिका साकारली आहे. छोट्या शहरामधून मुंबईमध्ये येऊन स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या एका मुलीची गोष्ट फॅशन या चित्रपटात दाखवली आहे. त्या मुलीला कोणकोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली.
पेज 3 (Page 3)
ग्लॅमरस वर्ल्डमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकार किंवा चित्रपटसृष्टीमधील काही लोक हे काय करतात. तसेच एखाद्या चित्रपटामध्ये काम मिळवण्यासाठी कलाकार कोणती कामं करतात हे पेज 3 या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. पेज 3 चित्रपटामध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ओम शांती ओम (Om Shanti Om)
शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ओम शांती ओम या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शांती प्रिया या अभिनेत्रीच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. अभिनेत्री शांती प्रिया आणि एका चित्रपट निर्मात्याचे आयुष्य तसेच एका ज्यूनियर अॅक्टरची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
