Bollywood Celebrity : कोण शॅम्पू तर कोण कपडे विकतय; बॉलिवूड सेलिब्रिटी झाले बिझनेसमॅन
Bollywood Celebrity : बॉलिवूडचे कलाकार सिनेमांत काम करण्यासोबत व्यवसायदेखील करत आहेत.
Bollywood Celebrity Business : बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आता अभिनय क्षेत्रात काम करण्यासोबत व्यवसायदेखील सांभाळत आहेत. काहींनी स्वत:चा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तर काही मंडळी सिने-निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. यात सलमान खान (Salman Khan), आलिया भट्ट (Alia Bhatt), प्रियंका चोप्रासह (Priyanka Chopra) अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. जाणून घ्या सेलिब्रिटीँच्या बिझनेसबद्दल... (Bollywood Celebrity Business)
आलिया भट्ट (Alia Bhatt) : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने लहान बाळांच्या कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या ब्रॅंडचं नाव 'एड-ए-मम्मा' (Ed-A-Manna) असं आहे. अनेकदा ती तिच्या ब्रॅंडचं प्रमोशन करताना दिसून येते.
सलमान खान (Salman Khan) : सलमानने त्याचा 'बीइंग ह्यूमन' (Being Human) हा ब्रॅंड 2007 साली लॉन्च केला होता. 'बीइंग ह्यूमन'च्या माध्यमातून ग्राहक कपडे, घड्याळ आणि ज्वेलरी खरेदी करू शकतात. या ब्रॅंडच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर सलमान खान शिक्षण आणि आरोग्यासंबंधित गोष्टींसाठी करतो.
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियंका चोप्राचा बोलबाला आहे. अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासोबत तिने स्वत:चा व्यवसायदेखील सुरू केला आहे. न्यूयॉर्कमध्ये तिने 'सोना' नावाचं हॉटेल सुरू केलं आहे. तसेच 'एनोमली' (Anamoly) नावाचा तिचा हेअर केअर ब्रॅंडदेखील आहे.
कतरिना कैफ (Katrina Kaif) : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ 'के ब्यूटी' (Kay Beauty) या ब्रॅंडची मालकीन आहे. तिचा हा कॉस्मेटिक ब्रॅंड खूपच लोकप्रिय आहे.
ऋतिक रोशन (Hrithik Roshan) : ऋतिक रोशनचा HRX हा कपड्यांचा ब्रॅंड आहे. त्याच्या या ब्रॅंडमध्ये जिमचे कपडे मिळतात.
सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा नेल ब्रॅंड आहे.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) : अनुष्का शर्माचा महिलांच्या कपड्यांच्या 'नूश' नावाचा ब्रॅंड आहे. तिच्या या ब्रॅंडमध्ये महिलांचे स्टाइलिश कपडे उपलब्ध आहेत.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) : आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांना घायाळ करणाऱ्या शिल्पा शेट्टीचं मुंबईत स्वत:चं हॉटेल आहे. या हॉटेलचं नाव 'बास्टियन' असं आहे.
निर्मिती संस्थेत बॉलिवूडकरांचा बोलबाला
शाहरुख खानच्या निर्मिती संस्थेचं नाव 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आहे. आमिर खानच्या निर्मिती संस्थेचं नाव 'आमिर खान प्रोडक्शन हाऊस' आहे. तर 'हरि ओम प्रोडक्शन्स' असं अक्षय कुमारच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे.
संबंधित बातम्या