Malaika Arora : रणबीर-आलियाच्या रिसेप्शनला जाण्यास मलायका नव्हती तयार! कारण सांगताना म्हणाली...
Malaika Arora : मुंबई-पुणे हायवेवर 2 एप्रिल रोजी मलायकाच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात झाला, तेव्हा मलायका पुण्याहून परतत होती.
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचा गेल्या महिन्यात पुण्याहून मुंबईला जाताना कार अपघात झाला होता. अपघातानंतर सार्वजनिकरीत्या ती पहिल्यांदा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) रिसेप्शन पार्टीत दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले. यानंतर या जोडीने बी टाऊनसाठी खास रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहरुख खान, गौरी खान, करण जोहर, शकुन बत्रा आणि अयान मुखर्जी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मात्र, आता आपल्याला त्या पार्टीत जायचे नव्हते, असा खुलासा मलायका अरोराने केला आहे. यामागचं कारण देखील तिने सांगितलं आहे.
माझी मानसिकस्थिती अजूनही नाजूक!
अपघातानंतर झालेल्या परिणामांबद्दल बोलताना मलायका म्हणाली, ‘मला शारीरिकदृष्ट्या आता तंदुरुस्त वाटत आहे. पण, माझी मानसिक स्थिती अजूनही नाजूक आहे. मला भीती, चिंता आणि ताण आहे. मला कुठेही बाहेर जावे असे वाटतच नाही. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या पार्टीत जाण्यासाठी माझी खूप मनधरणी केली गेली. आजूबाजूला भरपूर लोक पाहून मला खूप ताण आला.’
तो अपघात कधीच विसरणार नाही!
मलायकानेही अपघातानंतर तिच्या मनात काय चालले होते, याचाही खुलासा केला. याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, ‘लोकांनी मला सांगितले की, मी सतत बेशुद्ध अवस्थेत माझ्या आई आणि मुलाबद्दल विचारत होते. त्यावेळी मी फक्त दोनच प्रार्थना करत होते, एक तर मला मरायचे नव्हते, दुसरे मला माझे डोळे गमवायचे नव्हते. तो अपघात खूप भयावह होता. कारच्या काचेचे छोटे तुकडे माझ्या डोळ्यात घुसले होते आणि मला काहीच नीट दिसत नव्हते.’
मुंबई-पुणे हायवेवर 2 एप्रिल रोजी मलायकाच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात झाला, तेव्हा मलायका पुण्याहून परतत होती. यातून बरे होण्यास वेळ लागला असला, तरी मलायका आता तिच्या सामान्य जीवनात परतली आहे.
हेही वाचा :
Khatija Rahman : खतीजा रहमानचा निकाह संपन्न! ए.आर.रहमानने लेकीला शुभेच्छा देत शेअर केली खास पोस्ट..
KGF 2 Breaks Record: ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर हवा! ‘RRR’ला मागे टाकत ‘रॉकी भाई’चा नवा रेकॉर्ड!