एक्स्प्लोर

Bollywood Actress Life: सलमान खानच्या 'या' हिरोईनचा जडला गँगस्टरवर जीव; करिअर बरबाद झाल्यानंतर बनली साध्वी, ओळखलं का कोण?

Bollywood Actress Life: आपण ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). 1993 मध्ये रिलीज झालेला 'करण अर्जुन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

Bollywood Actress Life: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांचं पर्सनल लाईफ नेहमीच चर्चेत असतं. बॉलिवूडच्या अशा अनेक सौंदर्यवती आहेत, ज्यांचं लव्ह लाईफ बऱ्याचदा वादाचा विषय बनतं. अशीच एक बॉलिवूडची सौंदर्यवती. जिचं सौंदर्य म्हणजे, जणू स्वर्गातून अवतरलेली अप्सरा. या अप्सरेनं सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गोविंदासोबत (Govinda) अनेक हिट फिल्म्स दिल्या. पण, तिच्या एका निर्णयानं तिनं स्वतःचं करिअर अक्षरशः बरबाद केलं. यासाठी कारण ठरलं, तिचा गँगस्टरसोबत जुळलेलं सूत. यामुळे ती वादाचा भोवऱ्यात सापडली. 

आपण ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). 1993 मध्ये रिलीज झालेला 'करण अर्जुन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात ममता कुलकर्णीनंही उत्तम भूमिका साकारली. तिचं 'मुझको राणा जी माफ करना' हे गाणंही खूप गाजलं. आजही तरुणाई या गाण्यावर थिरकते. ममता कुलकर्णीनं 1992 मध्ये राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्या 'तिरंगा' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 90 च्या दशकात त्यांनी अनेक बड्या स्टार्ससोबतही काम केलं. आशिक आवारा, करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी, आंदोलन, बाजी, चायना गेट या चित्रपटांमधून ममतानं बॉक्स ऑफिस गाजवलं.

पण ममता कुलकर्णी सर्वाधिक वादाच्या भोवऱ्यात सापडली, जेव्हा तिनं स्टारडस्ट मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं तेव्हा. संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. त्याचवेळी, दाऊद इब्राहिमच्या जवळच्या छोटा राजनसोबत अभिनेत्रीचं अफेअर असल्याचीही बातमी समोर आली होती. असं सांगितलं जातं की, ती एकदा छोटा राजनचा पाठलाग करत दुबईला पोहोचली होती. त्यानंतर काही काळानं एक अशी बातमीही समोर आली होती की, मता कुलकर्णीनं आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत लग्न केलं. 2016 मध्ये, विकी गोस्वामीवर 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमधील संशयित असल्याचा आरोप होता. गँगस्टरसोबत नाव जोडलं गेलं आणि अगदी करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या ममताचं करिअर बर्बाद झालं. पण जेव्हा-जेव्हा ममतावर असे आरोप झाले, तेव्हा-तेव्हा ममतानं हे सर्व आरोप फेटाळले. 

ज्यावेळी ममताला जाणवलं की, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा तिच्या करिअरवर परिणाम होतोय, त्यावेळी तिनं करिअर सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या ममता कुलकर्णी साध्वी म्हणून आपलं आयुष्य जगतेय. तिनं सिने इंडस्ट्रीच्या ग्लॅमरस दुनियेपासून एक विशिष्ट अंतर राखलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Embed widget