"माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर"; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खानला थेट इशारा
Somy Ali on Salman Khan: सोमी अलीनं सोशल मीडिया पोस्टद्वारे आरोप केला की, सलमान खानने तिच्या एका शोवर भारतात बंदी घालण्याचा प्रयत्न केला.
Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच... त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूड गाजवलं होतं. सध्या सोमी अली चर्चेत अली आहे ती तिनं पुन्हा एकदा सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे.
सोमी अलीनं यापूर्वीही सलमान खानवर अनेक आरोप केले आहेत. पुन्हा एकदा तिनं सलमान खानवर आरोप करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सलमानसोबत अफेअरमध्ये असताना तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप सोमी अलीनं पुन्हा एकदा केला आहे. यासंदर्भात तिनं अनेक सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमधून तिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सलमाननं शारीरिक, लैंगिक आणि मौखिक शोषण केल्याचा आरोप सोमीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. तसेच, सलमान खानच्या याच वागण्यामुळं ती काही दिवस ट्रॉमामध्ये होती, असंही सोमी अलीनं म्हटलं आहे.
सोमी अलीचे सलमानवर अनेक गंभीर आरोप
सोमीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आरोप केला आहे की, सलमान खाननं तिच्या एका शोवर भारतात बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, डिस्कव्हरी इंडियाचा शो फ्लाईट ऑर फाईट इन शोचं स्क्रीनिंग भारतात थांबवण्याचा प्रयत्न सलमाननं केलाय. यापूर्वीही सोमी अलीनं लैंगिक शोषण झाल्याची वाच्यता जाहीरपणे केली होती.
ती म्हणाली की, "काही वेळा पीडितेला तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराविषयी बोलण्यासाठी अनेक वर्षे लागतात. सलमान खान इतरांशी चांगलं वागत असेल तर, याचा अर्थ तो सगळ्यांशीच चांगलं वागत असेल असं नाही. सगळे लोक आतून 'काळे' असतात."
सलमाननं जाहीर माफी मागावी
सोमी अली म्हणाली की, "सलमान खाननं माझ्यासोबत जे काही केलं ते कबुल करावं, अशी माझी इच्छा आहे. मी शाब्दिक, लैंगिक आणि शारीरिक शोषणातून जे काही सहन केलं त्याबद्दल त्यानं जगासमोर माझी माफी मागावी. पण गर्विष्ठ आणि स्वार्थी माणूस कदाचित ही गोष्ट कधीच करणार नाही. त्यानं माझ्या शोवरील बंदी हटवावी. मला माझा शो 'नो मोअर टीअर्स' भारतात रिलीज व्हावा, मला हेच हवंय. माझ्या 15 वर्षांच्या मेहनतीनं मी हा शो बनवला आहे. या शोच्या माध्यमातून मी 40,000 स्त्री-पुरुषांचे प्राण वाचवले आहेत."
आरशात पाहून स्वतःला प्रश्न विचार, सोमीनं दिलाय सलमानला सल्ला
सोमी अली पुढे बोलताना म्हणाली की, "मला वाटतं की, मिस्टर खान यांनी स्वतःला आरशात पहावं आणि स्वतःला एक प्रश्न विचारावा... तू असं कसं बोलू शकतोस की, तू कधीच माझ्यावर हात उगारला नाही आणि मला कधीच शिवीगाळ केली नाही? हे सर्व माहीत असूनही तू कसा आरामात जगू शकतोस आणि नंतर या गोष्टी नाकारू शकतोस? नंतर माझ्या शोवर बंदी घालण्याचं धाडस करू शकतोस? लाज वाटली पाहिजे. मला आशा आहे की, एक दिवस तुझ्यात हिम्मत येईल आणि तू जगासमोर माझी माफी मागशील आणि माझ्यासोबत जे काही केलंस ते मान्य करशील."
महत्त्वाच्या इतर बातम्या :