एक्स्प्लोर

चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: अभिनेता विजय कृष्ण नरेश यानं त्याची कथित प्रेयसी पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे नरेश बाबू आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे.

Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) सावत्र भाऊ आणि अभिनेता विजय कृष्ण नरेश (Vijay Krishna Naresh) उर्फ ​​नरेश बाबू  (Naresh Babu) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच वादात असतो. सशक्त अभिनयासोबतच राजकारण (Politics) आणि सामाजिक कार्यासाठीही नरेश बाबू खूप चर्चेत असतात. सध्या हा अभिनेता त्याच्या चौथ्या लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आला आहे. नरेश बाबू त्याची कथित गर्लफ्रेंड पवित्रा लोकेशसोबत चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.  

नरेश बाबूनं तिन वेळा केलंय लग्न 

नरेश बाबू गेल्या काही काळापासून तेलुगू अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हिच्यासोबतच्या नात्याच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, नरेश बाबूचं एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा लग्न झालं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर नरेश बाबूचा एक लिपलॉक सीनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन नरेश बाबूची तिसऱ्या पत्नीनं टीकास्त्र डागलं आहे. नरेश बाबूची तिसरी पत्नी रम्या रघुपतीनं या व्हिडीओवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 

कसा व्हायरल झाला लिपलॉक व्हिडीओ..?

31 डिसेंबर 2022 रोजी नरेश बाबू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कथित गर्लफ्रेंड पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये दोघेही लिप-टू-लिप मूव्हमेंट शेअर करताना दिसले. हा व्हिडीओ शेअर करताना नरेश बाबूनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या व्हिडीओवर त्याची पत्नी चांगलीच भडकल्याचं दिसत आहे. त्याच्या पत्नीनं त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

तिसरी पत्नी म्हणते, चौथं लग्न करूच देणार नाही 

पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, नरेश बाबूची तिसरी पत्नी रम्या रघुपतीनं पतीला चौथ लग्न न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तिनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय की, "काहीही झालं तरी ती नरेशला चौथ्यांदा लग्न करू देणार नाही. याशिवाय, राम्या म्हणते की, नरेशनं तिला (रम्या) अजून घटस्फोट दिलेला नाही. अशातच घटस्फोट दिल्याशिवाय चौथ्यांदा लग्न करूच देणार नाही, असं तिनं ठणकावून सांगितलं आहे. एवढंच नाहीतर संतापलेल्या रम्यानं नवऱ्याच्या कृत्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. ती म्हणाली की, त्यानं आधीच तीनवेळा लग्न केलेलं असताना आणि प्रत्येक पत्नीपासून एक मूल असताना तो असं कसं करू शकतो...?"

नरेश बाबू यांचं आयुष्य आधीपासूनच विवादात 

नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश यांच्या लिपलॉक व्हिडीओबद्दल बोलायचं तर हा त्यांच्या आगामी चित्रपट मल्ली पेल्ली (मॅरी अगेन) च्या प्रमोशनल सीनशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पवित्रा लोकेशही पतीपासून विभक्त झाली आहे. तिनं 2007 मध्ये सुचेंद्र प्रसाद यांच्याशी लग्न केलं. परंतु रिपोर्ट्सनुसार, दोघेही 2018 मध्ये वेगळे झाले होते. परंतु, अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही.
 
नरेश बाबूला चप्पलेनं मारलेलं तिसरी पत्नी रम्यानं 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी जुलै 2022 मध्ये नरेश बाबूची पत्नी रम्या रघुपतीनं तिच्या पतीला आणि कथित प्रेयसी पवित्रा लोकेश यांना मसूरी येथील हॉटेलच्या खोलीत पकडलं होतं. ज्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. हॉटेलमध्ये प्रवेश करताच राम्यानं पती आणि कथित प्रेयसी पवित्रा लोकशवर चपलांचा वर्षाव केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget