Bobby Deol Animal Song Out: 'अॅनिमल' मधील बॉबी देओलचं एन्ट्री साँग आऊट; काही तासातच 'जमाल कुडू' ला मिळाले लाखो व्ह्यूज
Bobby Deol Animal Song Out: अॅनिमल चित्रपटामधील बॉबी देओलचं (Bobby Deol) एन्ट्री साँग रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं युट्यूबवर ट्रेंड होत आहे.
Bobby Deol Animal Song Out: अॅनिमल (Animal) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. अशातच आता टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन अॅनिमल चित्रपटामधील बॉबी देओलचं (Bobby Deol) एन्ट्री साँग रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर युट्यूबवर ट्रेंड होत आहे.
गाण्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती
अॅनिमल चित्रपटामधील 'जमाल कुडू' हे बॉबी देओलचं म्हणजेच अबरारचं एन्ट्री साँग रिलीज करण्यात आलेलं आहे. हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला रिलीज होताच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हे गाणं युट्यूबवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. अॅनिमल चित्रपट रिलीज झाल्यापासूनच बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या एन्ट्री साँगची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. अशातच हे गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे.
बॉबी देओलनं सोशल मीडियावर अॅनिमल या चित्रपटातील या गाण्याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "या गाण्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही या गाण्याबद्दल विचारले आणि आम्ही तुमचे बोलणे ऐकले, आज तुमच्यासाठी हे गाणे रिलीज करत आहोत! अबरार एन्ट्री साँग जमाल कुडू आज रिलीज होत आहे"
View this post on Instagram
टी-सीरिजच्या यु्ट्यूब चॅनलवर देण्यात आलेल्या क्रेडिटनुसार, हे गाणं क्लासिक इराणी बंदरी संगीत शैलीमधील आहे जे हर्षवर्धन रामेश्वर यांनी पुन्हा तयार केली. लहान मुलांचा कोरस देखील या गाण्यात अॅड करण्यात आला आहे.
संदीप रेड्डी वंगा यांनी 'अॅनिमल' या चित्रटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली.
संबंधित बातम्या: