एक्स्प्लोर

Suniel Shetty Birthday : 61 वर्षाचा झाला सुनील शेट्टी; जाणून घ्या कोट्यवधींचा मालक असणाऱ्या अभिनेत्याबद्दल

सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) आज 61 वा वाढदिवस आहे.

Suniel Shetty Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) आज 61 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमध्ये झाला.  सुनीलचं पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी असं आहे. सुनीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुनील त्याच्या फिटनेसनं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तर अनेक वेळा आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी...

हिट चित्रपटांमध्ये केलं काम 
सुनीलनं 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या बलवान या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 1994 मध्ये रिलीज झालेला  'मोहरा'  हा सुनीलचा पहिला हिट चित्रपट ठरला. त्यानंतर  1994 मध्येच दिलवाले चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील अभिनयासाठी सुनीलला अनेक पुरस्कार मिळाले.  'सुरक्षा', 'टक्कर', 'रक्षक', 'सपूत' , 'पहचान', 'गोपी किशन', 'दिलवाले', 'कृष्णा', 'बॉर्डर', 'भाई', 'हु तू तू', 'रिफ्यूजी', 'कांटे', 'कयामत', 'मैं हूं ना', 'हलचल', 'शूटआउट एट लोखंडवाला' , 'आवारा पागल दीवाना', 'फिर हेरा फेरी' , 'मुंबई सागा' यांसारख्या चित्रपटामध्ये सुनीलनं काम केलं. 

कोट्यवधींचा मालक आहे सुनील 
सुनील हा अभिनेता असला तरी तो बिझनेसमॅन देखील आहे. सुनीलची हाउस पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. तसेच त्याचे स्वत:चे एक हॉटेल देखील आहे. एका रिपोर्टनुसार, सुनील  100 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. सुनीलचं खंडाळा येथे फार्म हाऊस देखील आहे. मर्सिडीज GLS 350 D, हमर, रेंज रोव्हर वोग या लग्झरी गाड्या सुनीलकडे आहेत. 

1991 मध्ये सुनीलनं माना शेट्टीसोबत लग्न केलं. लग्नाआधी सुनील आणि माना हे आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. सुनील आणि मानाला अथिया आणि अहान ही दोन मुलं आहे. त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात काम करतात. 

वाचा इतर बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget