Bhushan Khumar: अभिनेत्यांच्या मानधनावर भूषण कुमार यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भूषण कुमार (Bhushan Khumar) यांनी बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनाबाबत चर्चा केली.
![Bhushan Khumar: अभिनेत्यांच्या मानधनावर भूषण कुमार यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले... bhushan kumar spoke about movie actors fees hikes Bhushan Khumar: अभिनेत्यांच्या मानधनावर भूषण कुमार यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/ffe8be16d79a0b202612cd8f9fded0571673834434787259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhushan Khumar: टी सीरिज (T-Series) या म्युझिक कंपनीचे मालक आणि चित्रपट निर्माता भूषण कुमार (Bhushan Khumar) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनाबाबत चर्चा केली. हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood) सध्या अनेक गोष्टी घडत आहेत, अशा परिस्थितीत अभिनेते जास्त मानधनाची मागणी करत आहेत. याबद्दल भूषण कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले भूषण कुमार?
काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाला होता की, तरुण कलाकार बॉक्स ऑफिसवर स्वत:ला सिद्ध न करता 30-35 कोटी मानधन मागतात. आता निर्माता भूषण कुमार यांनीही या विषयाबाबत एका मुलाखतीमध्ये मत मांडले. एका मुलाखतीत भूषण कुमार म्हणाले की, 'काही कलाकार त्यांच्या मानधनाबाबत ठाम असतात.'
भूषण कुमार यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बहुतेक कलाकार इंडस्ट्रीमधील गोष्टी समजून घेतात आणि त्यानुसार पैसे घेतात. काही अभिनेते असे आहेत जे त्यांच्या फीबद्दल ठाम आहेत. निर्माते अशा अभिनेत्यांसोबत काम करू इच्छित नाहीत कारण मोठे बजेट असणाऱ्या चित्रपटांमध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. अभिनेता जर जास्त मानधन घेत असेल तर हे निर्मात्यांसाठी योग्य नाही, विशेषत: जेव्हा अभिनेत्याने खूप कमाई केली आहे.'
'असेही काही कलाकार आहेत जे मानधन कमी करण्यास नकार देतात. ते अभिनेते म्हणतात, आम्ही तर एवढेच घेणार नाही तर आम्ही काम करणार नाही. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करत नाही. आम्ही त्यांना सांगत आहोत, आम्ही तुमच्यासोबत काम करणार नाही. आम्हाला नुकसान होईल असं काम आम्ही का करु? त्या अभिनेत्यांनी 2025 कोटी घ्यायचे आणि आम्ही चित्रपटाचं नुकसान सहन करायचं?' असंही भूषण कुमार यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी भूषण कुमार यांचा भूल भुलैय्या 2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच रिलीज होणार आहे, असं म्हटलं जाच आहे. भूल भुलैय्या-2 मध्ये कार्तिक आर्यननं (Kartik Aaryan) काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता भूल भुलैय्या 3 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)