(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhuban Badyakar : 'कच्चा बदाम' फेम भुबन बडायकरच्या अडचणीत वाढ; स्वतःच्याच गाण्यामुळे शोज मिळेना, कमाई होईना
Bhuban Badyakar : 'कच्चा बदाम' गाणं गात रातोरात स्टार झालेल्या भुबन बडायकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Bhuban Badyakar : 'बदाम...बदाम...कच्चा बदाम' या गाण्याने गेल्या काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला असून या गाण्याने भुबन बडायकर (Bhuban Badyakar) रातोरात स्टार झाला. पण आता भुबनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळवून दिली त्याच गाण्याने त्याला आता अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नेमकं प्रकरण काय?
भुबनची फसवणुक झाल्याचं समोर आलं आहे. भुबनच्या गाण्याचा एका व्यक्तीने कॉपीराइट घेतला आहे. त्यामुळे त्याला ते गाणं गाता येत नाही आहे. सोशल मीडियावर गाणं पोस्ट केल्यानंतर त्यांना कॉपीराइट पाठवला जात आहे. आता भुवन यांना गाणं गाता येत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं त्यांच्यासाठी कठीण झालं आहे. तसेच त्यांना गाण्याचे शोदेखील करता येत नाही आहेत.
भुबन यांच्याकडे गोपाल नावाच्या एका व्यक्तीने तीन लाख रुपये देत हे गाणं त्याच्या युट्यूबवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं. भुबन यांनी संबंधित व्यक्तीकडून पैसेदेखील घेतले होते. त्यामुळे आता भुबन जेव्हा गाणं गातात किंवा पोस्ट करतात तेव्हा त्यांना कॉपीराइटचा सामना करावा लागतो.
भुबन बडायकर म्हणाले,"गोपालने मला पैसे देत काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या. मी अशिक्षित असल्याने मला काही समजलं नाही. माझा अशिक्षित असण्याचा गोपाल यांना फायदा झाला. मला आता काम मिळत नसून कोणत्या कार्यक्रमातदेखील मी हे गाणं गाऊ शकत नाही. आता छोटी-मोठी कामं करत कसंतरी घर चालवत आहे".
View this post on Instagram
लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर भुबन यांनी गावी घर बांधण्याचा विचार केला होता. पण आता त्यांची परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. कॉपीराइटमुळे मला माझंचं गाणं गाता येत नाही आहे. तसेच कामदेखील मिळत नाही. भुबनचं 'बदाम...बदाम...कच्चा बदाम' हे गाणं चांगलच लोकप्रिय झालं होतं. अनेकांनी रील्सदेखील बनवले होते.
'कच्चा बदाम' गाण्याचा इतिहास काय आहे?
भुवन बडायकर शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं म्हणायचा. तो पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचा रहिवासी आहे. पश्चिम बंगालमध्ये बदामाला 'कच्चा बदाम' म्हणतात. भुवन शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.
संबंधित बातम्या