एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 : रिलीजच्या एक महिन्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; जगभरात केली 230 कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Worldwide Box Office : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला असून आजही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. या सिनेमाने जगभरात 230 कोटींची कमाई केली आहे. 

कार्तिक आर्यनने एक पोस्टर शेअर करत सिनेमाच्या कमाईसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाने जगभरात 230.75 कोटींची कमाई केली आहे. पोस्टर शेअर करत कार्तिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. कार्तिकने लिहिले आहे, 'भूल भुलैया 2' हा सिनेमा आजही तुम्ही सिनेमागृहात जाऊन पाहू शकता. सिनेमागृहात जाऊन नक्की पाहा." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा लवकरच 250 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या यशाने या सिनेमाचा निर्माता भुषण कुमारने कार्तिक आर्यनला एक महागडी आलिशान कार भेट दिली होती. या आलिशान कारची किंमत 4 कोटी होती. 

'भूल भुलैया 2' ओटीटीवर रिलीज!

'भूल भुलैया 2' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाका करत आहे. कार्तिक आर्यनची रूह बाबा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

Kartik Aaryan Car : 'भूल भुलैया 2'च्या यशाने भूषण कुमार भारावला; कार्तिक आर्यनला दिली महागड्या कारची भेट

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget