Bhavana Menon : पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी, आता केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी
Bhavana Menon : मल्याळम अभिनेत्री भावना मेनन पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी पडली होती.
Bhavana Menon : अभिनेत्री भावना मेनन (Bhavana Menon) नुकतीच केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) दिसून आली आहे. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. केरळ राज्याच्या चालचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजीत यांनी 'शक्तीचे प्रतीक' म्हणत भावनाला प्रेक्षकांसमोर आणले.
मल्याळम अभिनेत्री भावना मेनन पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी पडली होती. याप्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपवर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी 10 पैकी सात लोकांना अटकदेखील केली होती. पण पुराव्याअभावी त्यांना सोडायला लागले. तसेच दिलीपलादेखील जामीन मिळाला. या संपूर्ण प्रकरणामुळे भावना मेनन खूपच चर्चेत होती.
View this post on Instagram
पाच वर्षांनंतर भावना अचानक केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसली आहे. भावना लवकरच एका रोमॅंटिक सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. 17 फेब्रुवारी 2017 रोजी भावना शूटिंग संपवून घरी जाण्यासाठी कारमध्ये बसली. दरम्यान काही लोकांनी तिचे अपहरण केले होते.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार, सख्ख्या भावासोबतची भागीदारी तोडली
Alia Bhatt Upcoming Films : 'गंगूबाई काठियावाडी'नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

