एक्स्प्लोर
Advertisement
बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनमध्ये सलमानपेक्षा शाहरूखच पुढे
मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या 'सुल्तान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशभरात सलमानच्या चाहत्यांमध्येही 'सुल्तान'ची मोठी क्रेझ आहे. हा चित्रपट देशातील 4500 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला असून याचे सर्व शो हाउसफुल आहेत. पण तरीही बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत सलमानपेक्षा शाहरूख खानच पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण ट्रेड पंडीतांच्या मते दोन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहिले तर दबंग खानवर शाहरूखचे चित्रपट भारी पडत असल्याचे दिसते.
बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये शाहरूख खानचा 'हॅपी न्यू इअर' हा चित्रपट सर्वात जास्त हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी 44.97 कोटींचा गल्ला कमावला होता. तर दुसरीकडे सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.35 कोटी कमावले होते. तर 'सुल्तान'चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 36.54 कोटी रुपये झाले आहे.
'सुल्तान'च्या चांगल्या कमाईनंतरही शाहरूखचे चित्रपट सलमानला धोबी पछाड देत आहेत.
सलमान vs शाहरूखचे चित्रपट
1). शाहरूखचा 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.12 कोटींचा गल्ला गोळा केला होता. तर सलमानचा 'एक था टायगर' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 32.93 कोटींचा गल्ला कमावला.
2). शाहरूखच्या 'दिलवाले'ने पहिल्या दिवशी 21 कोटी रुपयांचा बिझनेस केला. तर सलमानची ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'ने पहिल्या दिवशी 27.25 कोटीची कमाई केली होती.
3). किंग खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'फॅन'ने सलमानच्या 'जय हो'ला मागे टाकले होते. शाहरूखच्या 'फॅन'ने 19.20 कोटीची कमाई पहिल्या दिवशी केली होती. तर 'जय हो' ने 17.25 कोटी रुपये कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement