एक्स्प्लोर
बर्थडे स्पेशल: श्रीदेवीने बोनी कपूर यांना बांधली होती राखी
श्रीदेवी आणि बोनी कपून या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर त्यांनी लग्नदेखील केले. परंतु लग्नापूर्वी श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी बांधली होती.
मुंबई : श्रीदेवी आता या जगात नाही, परंतु तिचे पती बोनी कपूर आज तिच्या आठवणीत त्यांचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर त्यांनी लग्नदेखील केले. परंतु लग्नापूर्वी एकदा श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी बांधली होती.
80 च्या दशकात श्रीदेवी एकापोठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट देत होती. तेव्हा श्रीदेवी व मिथुन चक्रवर्ती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये रंगत होत्या. श्रीदेवी आणि मिथुन यांनी लपून छपून लग्न केल्याच्या अफवादेखील पसरत होत्या. त्याच दरम्यान तिने बोनी कपूर यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट साईन केला होता. या चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवी आणि बोनी कपून दोघे एकत्र आल्याच्या बातम्या पसरू लागल्या. मिथुनला जेव्हा हे समजले, तेव्हा तो श्रीदेवीवर नाराज झाला. त्यानंतर मिथुनचा विश्वास जिंकण्यासाठी श्रीदेवीने बोनी कपून यांना राखी बांधली होती. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांनी हा किस्सा Savvy या मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
श्रीदेवी आणि तिच्या आईचे घट्ट नाते होते. चित्रपटांच्या सेटवर श्रीदेवीसोबत तिची आई किंवा बहिण नेहमी असायच्या. परंतु 1995 मध्ये श्रीदेवीच्या आईचे ब्रेन ट्युमरमुळे अमेरिकेतील एका रुग्णालयात निधन झाले. त्यादरम्यान श्रीदेवीची आर्थिक परिस्थितीदेखील ढासळली होती. अशा परिस्थितीत बोनी कपूर यांनी श्रीदेवीला आर्थिक आणि मानसिक मदत केली. मुश्कील परिस्थितीत साथ दिल्यामुळे श्रीदेवी बोनी यांच्या जवळ आली. बोनी कपूर यांचे तेव्हा लग्न झालेले होते. त्यांना अर्जून कपूर हा मुलगादेखील होता. परंतु तरिदेखील श्रीदेवी आणि बोनी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement