सौरव गांगुलीवर बायोपिक बनणार, 'हा' अभिनेता साकारणार 'दादा'ची भूमिका?
मोठ्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाईल आणि जर सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं तर ते 200 ते 250 कोटी असण्याची शक्यता आहे.
Sourav Ganguly Biopic Film : भारतीय क्रिकेटमधला 'दादा' अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर एक सिनेमा येणार आहे. महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्यानंतर सौरव गांगुलीचा क्रिकेटर म्हणून प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. स्वत: सौरव गांगुलीने याची माहिती दिली आहे. सौरवच्या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या चॉकलेटबॉय रणबीर कपूरचं नाव चर्चेत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सौरव गांगुलीने आपल्यावर बनणार आहे हे मान्य केलं. सौरवने मुलाखतील म्हटलं की, होय, मी बायोपिकला होकार दिला आहे. माझा हा चित्रपट हिंदीमध्ये असेल पण सध्या दिग्दर्शकाचे नाव सांगता येणे शक्य नाही. सर्वकाही निश्चित होण्यास अजून वेळ लागेल. विशेष म्हणजे रणबीरशिवाय इतर दोन कलाकारही मुख्य भूमिकेसाठी शर्यतीत आहेत. याआधी आपल्या बायोपिकबद्दल बोलताना नेहा धुपियाने असं सुचवले होते की, अभिनेता हृतिक रोशन सौरवच्या सर्वोत्कृष्ट पर्याय असू शकतो.
सौरव गांगुलीच्या जीवनावर सिनेमा आला तर त्यात टीम इंडियाच्या यशाचे अनेक किस्से दाखवणे शक्य होईल. सध्या मजबूत अवस्थेत असलेली टीम इंडिया गांगुली कर्णधार होण्याआधी एवढी मजबूत नव्हती. त्यामुळे सौरव गांगुली कर्णधार असताना त्याने टीम इंडियाला जिंकायला शिकवलं असं बोललं जातं.
View this post on Instagram
अशीही माहिती समोर येत आहेत की, मोठ्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाईल आणि जर सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं तर ते 200 ते 250 कोटी असण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायोपिक सुपरहिट ठरली होती. या चित्रपटात धोनीची भूमिका दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांने साकारली होती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरही बायोपिक आली होती ज्यात इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर देखील बायोपिक आहे. या सिनेमाचे नाव '83' आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आहेत. मात्र हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही.